ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आठ जणांच्या निलंबनानंतर आता…

Lalit Patil Drug Case | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सर्व बाजूने पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. ललित पाटील याला अटक केल्यानंतर त्यांना मदत करणारे सर्वच रडारवर आले आहे. त्याचवेळी पोलिसांनी विभागातही कारवाई सुरु केली आहे.

ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आठ जणांच्या निलंबनानंतर आता...
Lalit Patil
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 11:12 AM

योगेश बोरसे, पुणे | 27 ऑक्टोंबर 2023 : ललित पाटील येरवडा कारागृहातील कैदी होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. 2 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून तो फरार झाला. त्यानंतर पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली. ससून रुग्णालयातील कारभारावर प्रश्न उपस्थित होऊ लागला. यामुळे पुणे पोलिसांनी कारवाई सुरु केली. या प्रकरणाची चौकशी करुन दोषी असणाऱ्या आठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन केले. त्यानंतर आता पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली. कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. यामुळे या प्रकरणात निलंबन होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 9 झाली आहे.

संशयित इसामाने आणून दिले मोबाईल

ड्रग्जमाफिया ललित पाटील पलायन प्रकरणी महिला पोलीस शिपाई सविता हनुमंत भागवत निलंबित केले. पुणे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. ससून रुग्णालयातील 16 नंबर वार्डात ड्रग्जमाफिया ललित पाटील याला सविता भागवत याने मदत केल्याचा आरोप आहे. सविता भागवत बंदोबस्तासाठी हजर असताना एका संशयित व्यक्तीने काळा रंगाच्या बॅगमधून ललित पाटील याला मोबाईल दिले होते. यामुळे महिला पोलीस सविता भागवत यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत निलंबन करण्यात आले.

यापूर्वी आठ जणांचे निलंबन

ललित पाटील फरार झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कठोर कारवाई केली. त्यांनी 2 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षकांसह 8 जणांचं तडकाफडकी निलंबन केलं होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे क्राईम ब्रँचकडे देण्यात आला होता. यामुळे या प्रकरणात निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 9 झाली आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पोलीस विभागात चांगला वचक निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

ससून रुग्णालयात संशतिय इसामाने घेतली भेट

ललित पाटील पळून जाण्याच्या एक दिवस अगोदर एका संशयित इसमाने त्याची भेट घेतली होती. त्यावेळी बंदोबस्तासाठी सविता भागवत होते. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर सविता भागवत यांचा कामातील हलगर्जीपणा समोर आला आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.