Loksabha 2023 : पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार की नाही? काय होणार निर्णय

pune lok sabha election : पुणे लोकसभा पोटनिवडणूक अजून जाहीर झालेली नाही. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांमध्ये भावी खासदार म्हणून बॅनरवॉर झाले होते. आता ही निवडणूक होणार की नाही? हाच प्रश्न आहे.

Loksabha 2023 : पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार की नाही? काय होणार निर्णय
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 9:36 AM

पुणे : पुणे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. या जागेवर पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. खासदार बापट यांचे निधन होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. दुसरीकडे लोकसभेचा कार्यकाळ आता जवळपास दहा महिने राहिला आहे. त्यामुळे पुणे येथील लोकसभेची निवडणूक होणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर अजून मिळाले नाही. त्याचवेळी दुसरीकडे विविध पक्षातील इच्छुकांनी मात्र भावी खासदाराचे बॅनरबाजी करुन घेतली होती.

काय आहे पुणे शहरातील गणित

कसबा विधानसभा पोटनिवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. कसबा पेठ हा भाजपचा मतदार संघ असताना त्यात भाजप उमेदवार विजयी होऊ शकला नाही. महाविकास आघाडीच्या या विजयानंतर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाली. काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा केला. भाजपमधील इच्छुकांनी तयारी केली. या तिन्ही पक्षांमधील नेत्यांनी भावी खासदार म्हणून बॅनर लावली. परंतु ही निवडणूक होणार आहे की नाही? हा प्रश्न आहे. आता राजकीय तज्ज्ञांकडून या निवडणुकीची शक्यता दुरावली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. यामुळे पुणे लोकसभेचा सामना २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत होईल, अशी शक्यता आहे.

पोटनिवडणूक टाळली जाणार

लोकसभेचा कार्यकाळ संपण्यास दहा महिन्यांचा कालावधी आहे. निवडणूक जाहीर होणे अन् निवडणूक घेणे या प्रक्रियेसाठी महिनाभर लागू शकतो. यामुळे पुणे लोकसभेच्या नवनिर्विचित खासदारास फक्त सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. यामुळे ही निवडणूक टाळली जाणार की काय? अशी शंका आहे. तसेच कसबा पेठ पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भारतीय जनता पक्षाने सावध पावले उचलली आहे. भाजपकडून लोकसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्याचवेळी सामना होईल का? अशी शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

विधानसभेची पोटनिवडणूक काही दिवसांत झाली होती

कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाले होते. त्यानंतर १८ जानेवारी रोजी पोटनिवडणूक जाहीर केली होती. २६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. अन् दोन मार्चला मतमोजणी झाली होती. परंतु लोकसभा पोटनिवडणूक अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे ही निवडणूक होणार की नाही? हीच चर्चा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.