लोणावळा लोहगडावरील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी सांगितला हा उपाय

pune lonavala lohagad fort : शनिवार अन् रविवारी वर्षासहलसाठी अनेक जण बाहेर पडू लागले आहे. यामुळे मागील आठवड्यात लोणावळा येथील लोहगडावर असंख्य पर्यटक अडकले होते. आता त्यावर उपाययोजना केल्या आहेत.

लोणावळा लोहगडावरील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी सांगितला हा उपाय
pune lonavala lohagad fort
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 10:22 AM

रणजित जाधव, लोणावळा, पुणे : मुंबई अन् पुणेकरांचा वीकेंड लोणावळा अन् खंडाळा येथे साजरा होत असतो. गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलले आहे. पुणे, मुंबई परिसरात रिमझिम पाऊस पडत आहे. यामुळे शनिवार, रविवारची सुटी साजरी करण्यासाठी मुंबई, पुणेकर लोणावळात गर्दी करतात. यामुळे मागील आठवड्यात लोणावळा परिसरात असलेल्या लोहगडावर हजारो पर्यटक अडकून बसले होते. मागील रविवार गडावर वर्षाविहार करण्यासाठी अनेक जण आले होते. त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. अक्षरशः पाऊल ठेवायला देखील जागा नसल्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

काय झाला होता प्रकार

लोणावळा येथील लोहगडावर रविवारी २ जुलै चांगलीच गर्दी झाली होती. शेकडो पर्यटक काही तास गडावर अडकून पडले होते. सुदैवाने या घटनेत चेंगराचेंगरी झालेली नाही. लोहगडावर पावसाळ्यात दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी किंवा गडावरती योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली होती. अखेर लोणावळा पोलिसांनी उपाययोजना सुरु केली आहे.

काय केले उपाय

लोणावला पर्यटननगरी आहे. या ठिकाणी विकेंडला राज्यभरातून पर्यटक येत असतात. पर्यटकांची होत असलेल्या गर्दीमुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होते. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मार्ग काढला आहे. पोलिसांनी कार्ला फाटा ते लोहगड या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर पर्यटकांनी लोहागडाकडून परत येत असताना मळवली- देवले या मार्गाचा वापर करावा, असा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून दिलेल्या पर्यायी मार्गाने प्रवास करणे बाबत स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस मित्र संघटना तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

मागील आठवड्यात लोहगडावर प्रचंड गर्दी झाली होती. त्या प्रकारामुळे पोलिसांनी पर्यटकांच्या सोयीसाठी हा बदल केला आहे. याच मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी एकेठिकाणी होणार नाही.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.