Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ गोष्ट पुणेकर नेहमी लक्षात ठेवतील, महापौरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

Pune | मी नेहमी समन्वयाने पुढे जाण्याचे धोरण ठेवतो. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पुण्याला मदत मिळत नसतानाही मी कधी राजकारण केलं नाही.मात्र, आता मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण मला देण्यात आले नव्हते. हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे

'ही' गोष्ट पुणेकर नेहमी लक्षात ठेवतील, महापौरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 2:28 PM

पुणे: मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण न दिल्यावरुन आता भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकारण रंगण्याची चिन्हं दिसत आहेत. हा व्यक्तिशः माझाच नव्हे तर पुणेकरांचाही (Pune) अपमान आहे. ही गोष्ट पुणेकर कायम लक्षात ठेवतील, असा इशारा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीला दिला. (Pune Mayor Murlidhar mohol slams NCP)

ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखविली. मी नेहमी समन्वयाने पुढे जाण्याचे धोरण ठेवतो. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पुण्याला मदत मिळत नसतानाही मी कधी राजकारण केलं नाही. मात्र, आता मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण मला देण्यात आले नव्हते. हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे, असे मोहोळ यांनी म्हटले. राज्य सरकारने पालिकेला कोरोना काळात भरीव मदत केली नाही, असा आरोपही महापौरांनी केला. त्यामुळे आता यावर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रतिक्रिया देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘कोरोना लस न घेतल्यास वेतन स्थगिती?’

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad) कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल, तर त्यांचे वेतन स्थगित होऊ शकते. त्या संबंधीचे परिपत्रक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे. किमान 20 जुलैपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस (Corona Vaccine) घेण्याची मुदत कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी, अशी जनजागृती प्रशासन करत आहे. अशात महापालिकेचे कर्मचारी लसीअभावी मागे राहू नयेत, म्हणून थेट वेतन स्थगित करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी 20 जुलैपर्यंत लस न घेतल्यास त्यांचं वेतन स्थगित होऊ शकतं, असं परिपत्रकाद्वारे आयुक्तांनी सूचित केलं आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 7 हजार 479 कर्मचारी आहेत. यात अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक कर्मचारी, मानधनावरील तसेच ठेकेदार पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, मात्र काही कर्मचाऱ्यांनी अद्यापही ही लस घेतलेली नाही.

संबंधित बातम्या: 

कोरोना लस न घेतल्यास वेतन स्थगिती? पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर्मचाऱ्यांना इशारा

डेल्टा प्लस व्हॅरिएंटचा वाढता धोका, 60 रुग्णांचा आकडा पार, धाकधूक वाढली, पुण्यातल्या शास्त्रज्ञांची महत्त्वाची माहिती

पावसाळी सहल महागात, पुण्यात कांचन धबधब्यावर गर्दी, पर्यटकांकडून दंडवसुली

(Pune Mayor Murlidhar mohol slams NCP)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.