Pune Metro : पुणेकरांनी सोडला दुचाकीचा हट्ट, ऑगस्ट महिन्यात पुणे मेट्रोची दमदार कामगिरी

Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले. यानंतर मेट्रो पुणेकरांसाठी सुरु झाली. पुण्यातील दोन मार्ग सुरु होऊन आता महिनाभर झाला आहे. महिन्याभरात किती पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास केला पाहू या...

Pune Metro : पुणेकरांनी सोडला दुचाकीचा हट्ट, ऑगस्ट महिन्यात पुणे मेट्रोची दमदार कामगिरी
Pune Metro
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 10:24 AM

पुणे | 1 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग सुरु होऊन आता महिनाभर झाला आहे. या महिन्याभरात पुणेकरांनी मेट्रोला कसा प्रतिसाद दिला? यासंदर्भातील माहिती आली आहे. पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. अनेक पुणेकरांनी दुचाकी सोडून मेट्रोला पसंती दिली आहे. महिन्याभरात चांगले उत्पन्न मेट्रोला मिळाले आहे.

किती जणांनी केला प्रवास

पुणे मेट्रोतून 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान सरासरी 65 हजार 822 जणांनी प्रवास केला आहे. मेट्रोमधून या महिन्यात 20 लाख 40 हजार 484 जणांनी प्रवास केला आहे. त्यामुळे मेट्रोला 3 कोटी 7 लाख 66 हजार 481 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मेट्रोचे रोजचे सरासरी उत्पन्न 9 लाख 78 हजार 783 रुपये आहे. रविवारी मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक राहिली आहे. रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सरासरी 1 लाख आहे. जिल्हा न्यायालयाच्या मार्गावर सर्वाधिक 2 लाख प्रवाशी राहिले आहे तर सर्वात कमी प्रवासी पीसीएमसी मेट्रो स्टेशनवर राहिले आहे. या ठिकाणावरुन फक्त 10 हजार 432 जणांनी प्रवास केला.

अनेकांनी सोडली दुचाकी, मेट्रोला पसंती

मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मेट्रोतून प्रवास करताना वेळ वाचत आहे तसेच वाहतूक कोंडीत अडकण्याची भीती नाही. यामुळे अनेकांनी आपल्या दुचाकी सोडून मेट्रोनेच प्रवास करणाऱ्यास प्राधान्य दिले आहे. 20 ते 25 हजार प्रवाशांनी स्वत:चे वाहन टाळून मेट्रोने प्रवास सुरु केला असल्याचे दिसून येत आहे. पुणेकर वैयक्तीक ऐवजी सार्वजनिक वाहतुकीच्या दोन्ही सेवांना अधिकाधिक पसंती देत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या मार्गावर किती उत्पन्न

  • वनाज ते रुबी हॉल मार्गावर 1 कोटी 65 लाख 30 हजार 29 रुपये मिळाले आहे.
  • पिंपरी ते सिव्हील कोर्ट मार्गावर 1 कोटी 42 लाख 36 हजार 453 रुपये मिळाले आहे.
  • मेट्रोला एकूण 3 कोटी 7 लाख 66 हजार 481 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
  • मेट्रोचे रोजचे सरासरी उत्पन्न 9 लाख 78 हजार 783 रुपये आहे.

मेट्रोची संख्या वाढणार

पुणे शहरात सध्या 20 मेट्रो आहेत. त्याची संख्या वाढवून 34 करण्यात येणार आहे. यामुळे पुणे मेट्रोच्या ताफ्यात 14 नवीन मेट्रो येणार आहेत. पिंपरी ते सिव्हल कोर्ट हा रस्ते मार्गाने तासभराचा प्रवास मेट्रोमुळे 20 ते 25 मिनिटांवर आला आहे.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.