मेट्रोचे चालले तरी काय? भरती पुणे मेट्रोसाठी, जाहिरात बिहारी वृत्तपत्रांमध्ये

pune metro jobs : पुणे मेट्रोची घोषणा झाल्यानंतर शहरातील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे युवकांनाही आनंद झाला होता. त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याची अपेक्षा होती. परंतु भरतीची जाहिरात बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये दिली गेली आहे.

मेट्रोचे चालले तरी काय? भरती पुणे मेट्रोसाठी, जाहिरात बिहारी वृत्तपत्रांमध्ये
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 3:34 PM

पुणे : पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील काम सुरु आहे. पुणेकरांना मेट्रोचं खास गिफ्टचं मिळाले होते. मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत होईल, सोबत शहराचा विकास होईल अन् रोजगार वाढणार आहे, अशी अपेक्षा होती. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, असे म्हटले जात होते. परंतु राज्यातील लोकांच्या अपेक्षांना खोडा घालण्याचे काम पुणे मेट्रोने केले आहे. मेट्रोसाठी आवश्‍यक कामगार भरतीची जाहिरात बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये दिली आहे.

मनसे आक्रमक

पुण्यातील मेट्रो भरतीची जाहिरात पटणा, बिहार येथे न होता महाराष्ट्रात त्या नोकरीची जाहिरात दिली पाहिजे तसेच पुणे मेट्रो येथे स्थानिक मराठी तरुणांना नोकरी मिळालीच पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले. भूमीपुत्रांना रोजगारापासून वंचित ठेवत असल्याबद्दल मनसेने मेट्रो प्रशासन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन केले. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.

हे सुद्धा वाचा

यावेळी बोलताना साईनाथ बाबर म्हणाले, महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या विरोधी भूमिका पुणे मेट्रोने घेतली आहे. या प्रकाराचा मनसने निषेध केला आहे. भरतीची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिलेली नाही. बिहारमधील नोकरभरती तातडीने थांबवा, अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

कधी होणार मेट्रोचे काम पूर्ण

हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती हबशी जोडणारा पुणे मेट्रो लाइन 3 प्रकल्प (Pune Metro Line 3 project) मार्च 2025पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. टाटा प्रकल्प टप्प्याटप्प्याने काम करण्याऐवजी संपूर्ण 23 किमी लांबीच्या मेट्रोचे काम हाती घेतले जाणार आहे. मार्च 2025पर्यंत कार्यान्वित होणार आहे.

दोन्ही मेट्रो मार्गांवर एकच कार्ड

दोन्ही महानगरांसाठी मोबिलिटी कार्ड सारखेच असेल. दोन्ही मेट्रो मार्गांवर प्रवासी एकच कार्ड वापरू शकतात. सर्व शहरांमध्ये एकच मेट्रो कार्ड सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. मेट्रो कार्ड सर्व भारतीय शहरांमध्ये वापरले जाऊ शकते जेथे मेट्रो कार्यरत आहे, असे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.