पुणे मेट्रोची कामे सुरु, आता हे मार्ग असणार बंद

पुणे महामेट्रोकडून वनाझ ते रामवाडी मार्गावर मेट्रोचे काम जोरात सुरू करण्यात आले आहे. या मार्गावर इतर अनेक कामे झाली असली, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूजवळील वायडक्टचे काम अद्याप बाकी आहे. यामुळे वाहतूक मार्गात बदल केला आहे.

पुणे मेट्रोची कामे सुरु, आता हे मार्ग असणार बंद
File Photo
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 4:23 PM

पुणे : पुणेकरांना मेट्रोतून लवकर प्रवास करता यावा यासाठी मेट्रो प्रशासनाकडून गतीने काम सुरू आहे. नुकतेच शिवाजीनगर ते रूबी हॉल मेट्रो क्लिनिक मेट्रो (Ruby Hall Clinic Metro Station) पर्यंत मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. पुणे शहरात मेट्रो लवकर सुरु करण्यासाठी वेगाने कामे केली जात आहेत. या कामांमुळे वाहतुकीत काही बदल केले जात आहे. अनेक मार्गातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आता बाबासाहेब आंबडेकर पुतळा ते नगर रोडकडे जाणारी वाहतूक बंद केली जाणार आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने जाणार आहे.

कधीपासून वाहतूक बंद

पुणे महामेट्रोकडून वनाझ ते रामवाडी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहेत. या मार्गावर सर्व कामे झाली असली, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूजवळील वायडक्टचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नगर रस्तावरील वाहतूक ३१ मार्चपासून २१ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत ही वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे पुढील २२ दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

हा असणार पर्यायी मार्ग

पुणे स्टेशन ते येरवडाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाहन मोबज चौक, मंगलदास रोड, चौक, कोरेगाव पार्क जंक्शन व पर्णकुटी चौक असा मार्ग असणार आहे. पुणे स्टेशनकडून बोट क्लबकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ढोले-पाटीलने जाता येईल. बोट क्लब रोडकडून येरवडाकडे येणारी वाहने कोरेगाव पार्क चौकातून सरळ श्रीमन चौक मार्गे अमृतलाल मेहता रोडकडे जाऊ शकणार आहेत.

येरवडाकडून पुणे स्टेशनकडे येणारी वाहन पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, ब्लू डायमंड चौककडे जाऊ शकतात.

आनंदाच्या क्षणासाठी पुणे मेट्रो भाड्याने

पुणे मेट्रोने नुकतीच आपल्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर आनंदाच्या क्षणासाठी मेट्रोचे पॅकेज दिले आहे. मेट्रोच्या या जाहिरातीवर चौफेर टीका होत आहे. सोशल मीडियातून कॉमेंटचा पाऊस पडत आहे. मेट्रोला वेगवेगळे सल्ले दिले जात आहे….वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.