एमपीएससी पास दर्शना पवार हत्येसाठी राहुल याने सोमवार का निवडला? पोलीस तपासातून आली माहिती समोर

Pune Cirme News : पुणे एमपीएससी परीक्षा पास झालेली दर्शना पवार हिच्या हत्याप्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. राहुल हंडोरे याने दर्शनाची हत्या करण्याचा संपूर्ण प्लॅन तयार केला होता. त्यानंतरच त्याने तिला राजगडावर नेले.

एमपीएससी पास दर्शना पवार हत्येसाठी राहुल याने सोमवार का निवडला? पोलीस तपासातून आली माहिती समोर
darshana and rahul
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 2:22 PM

पुणे : पुणे येथील दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. दर्शनाचा मित्र असलेला राहुल हंडोरे यानेच तिची हत्या केली होती, हे स्पष्ट झाले. त्यानंतर राहुल हंडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ग्रामीण पोलिसांनी २२ जून रोजी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याची पोलीस कोठडी घेतली. त्या पोलीस कोठडी दरम्यान त्याची कसून चौकशी केली. यावेळी राहुल हंडोरे याने आरोप कबुल करत पोपटासारखी सर्व माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार दर्शना हिला लग्नाचे विचारायचे अन् तिने नकार देताच तिची हत्या करायची, असा पूर्ण प्लॅन त्याने केला होता.

काय होता राहुल याचा प्लॅन

राहुल हंडोरे याच्या पोलीस कोठडीची मुदत २९ जून रोजी संपली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत ३ जुलैपर्यंत राहुल हंडोरे याला पोलीस कोठडी दिली. दरम्यान चौकशी दरम्यान राहुल हंडोरे याने दर्शना हिच्या हत्येसाठी सोमवारच का निवडला होता? याची माहिती दिली आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, शनिवार आणि रविवारी राजगडावर ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांची गर्दी जास्त असते. परंतु सोमवारी गर्दी नसते. यामुळे दर्शनाला सोमवारी राजगडावर न्यावे, तिला लग्नाचे विचारावे अन् नकार देताच संपवावे, अशा आराखडा त्याने केला होता. त्यासाठी त्याने ब्लेडही खिशात ठेवला होता. हा ब्ले़ड लहान असला तरी त्यामुळे मोठी दुखापत होते.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी जप्त केली गाडी अन् ब्लेड

राहुल हंडोरे ज्या गाडीने दर्शनाला घेऊन राजगडावर गेला होता, ती गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच ब्लेडसुद्धा पोलिसांना मिळाले आहे. ज्या दुकानातून राहुल याने ब्लेड घेतला होता, ते दुकानही पोलिसांना मिळाले आहे. आता पोलीस चौकशी दरम्यान तो अजून माहिती देणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपासाला अधिक वेग येणार आहे. त्यानंतर लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल होणार आहे.

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.