पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्ग देशात सर्वाधिक महागडा, आता पुन्हा दरवाढ

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर 2004 ला टोल सुरू झाला. हा टोल सुरु करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार टोलच्या दरात 18 टक्के वाढ 1 एप्रिल 2023 पासून करण्यात येणार आहे. परंतु ही दरवाढ देशात सर्वाधिक आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्ग देशात सर्वाधिक महागडा, आता पुन्हा दरवाढ
पुणे सातारा महामार्गावर टोल नाकाImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 8:21 AM

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. आता या मार्गावरील टोल वाढणार आहे. आधीच देशात सर्वाधिक टोल या मार्गाचा आहे. त्यातही आता 1 एप्रिलापासून वाढ होणार आहे. यामुळे प्रवाशांना जास्त दर देऊन प्रवास करावा लागणार आहे. या मार्गावरील टोल चक्रवाढ पद्धतीने वाढत आहे. देशातील सर्वाधिक मोठा असलेल्या यमुना एक्स्प्रेस वे पेक्षाही जास्त टोल मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आकारला जात आहे. आता यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे. त्यावर 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

१ एप्रिलापासून दरवाढ

2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार टोलच्या दरात 18 टक्के वाढ 1 एप्रिल 2023 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जाताना आता वाढीव टोल देऊन प्रवास करावा लागणार आहे. परंतु ही दरवाढ देशात सर्वाधिक आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रतिकिलोमोटीर 1.73 रुपये टोल कारसाठी आकारला जातो. तो मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर तब्बल 3.40 रुपये प्रतिकिलोमीटर आहे. इतका टोल देशात कुठेही नाही.

हे सुद्धा वाचा

किती आहे टोल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा 94 किलोमीटरचा आहे. त्यासाठी आता 320 रुपये लागणार आहे. म्हणजे हा दर3.40 रुपये प्रतिकिलोमीटर होतो. नागपूर-शिर्डी हा 520 किलोमीटर मार्गासाठी कारचा दर 900 रुपये आहे. म्हणजेच तो प्रति किलोमीटर 1 रुपये 73 पैसे आहे. उत्तर प्रदेशातील यमुना एक्प्रेस हा सर्वात मोठा मार्ग आहे. त्या ठिकाणी 2 रुपये 65 पैसे इतका दर प्रतिकिलोमीटर आहे.

चक्रवाढ पद्धतीने वाढ

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर चक्रवाढ पद्धतीने दर तीन वर्षांनी वाढ होते. 2017 मध्ये कारसाठी 195 रुपये दर होता. 2020 मध्ये त्यात 40 रुपयांनी वाढ झाली. तो 270 रुपये झाला. आता 2023 मध्ये त्यात 50 रुपयांची वाढ होत आहे आणि तो 320 रुपये केला गेला आहे.

किती वाढले दर

चार चाकी वाहन

सध्याचे दर 270 एप्रिल 2023 पासून नवीन दर 320

टेम्पो

सध्याचे दर 430 एप्रिल 2023 पासून नवीन दर 495

ट्रक

सध्याचे दर 580 एप्रिल 2023 पासून नवीन दर 685

बस

सध्याचे दर-797 एप्रिल 2023 पासून नवीन दर 940

थ्री एक्सल वाहन

सध्याचे दर-1380 एप्रिल 2023 पासून नवीन दर 1630

एम एक्सल वाहन

सध्याचे दर-1835 एप्रिल 2023 पासून नवीन दर 2165

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे संदर्भात न्यायालयात याचिका, वाहनधारकांना दिलासा मिळणार का?…सविस्तर वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.