असा अपघात आतापर्यंत कधीच पाहिला नसणार, डिव्हाईडरचा अख्खा रॉड कारमध्ये घुसला, पाहा फोटो
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर अपघातांची संख्या सतत वाढत आहे. अनेक अपघात चालकांच्या चुकीमुळे होत आहेत. वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही, यामुळे अपघातांची संख्या वाढलीय.
मावळ,पुणे : पुणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आणखी एक भीषण अपघात झालाय. विचित्र अपघातात डिव्हाईडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून घुसला. अपघातानंतरचे हे फोटो पाहिल्यावर गाडीतील कोणी प्रवासी बचावला की नाही? असा प्रश्न पडतो. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. डिव्हाईडर मागून काच फोडून घुसलेला रॉड पुढची काच फोडून बाहेर निघाला. यावरून या अपघाताची तीव्रता सहज लक्षात येईल.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चालकांनी सावध रहावे. वाहतूक नियमांचे पालन करावे, वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शनिवारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आणखी एक भीषण अपघात झालाय. अपघात झाला त्यावेळी चालक आणि दोन महिला असे तीन प्रवासी गाडीत होते.
डिव्हाईडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबरमधून घुसला. अपघातानंतरचे हे फोटो पाहिल्यावर गाडीतील कोणी प्रवासी बचावला की नाही? असा प्रश्न पडतो. पण सुदैवाने तीन प्रवाश्यांपैकी दोन जणांना काहीच झाले नाही. एका प्रवाश्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कारचा हा अपघात सोमाटने फाट्यावर झाला. मुंबईवरून सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन गाडी थेट अशा पध्दतीने डिव्हाईडर मध्ये घुसली.
भरधाव वेगानं बेदरकारपणे वाहन चालवणं, टायर फुटणं, लेन कटिंग, ओव्हरटेंगिक यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचं समोर आलंय. आतापर्यंत झालेल्या अपघाताच्या वेळा पाहिल्यास, सर्वाधिक अपघात हे रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.