पुणेकरानों आपलेच फक्त एक काम करा, अन् जिंका टू बीएचके घर, चारचाकी, दुचाकी, स्मार्ट फोन

Pune News : आता प्रत्येक पुणे शहरातील व्यक्तीला बक्षीस जिंकण्याची संधी आहे. दरवर्षी करावे लागणारे आपले एक काम वेळेत केल्यास त्यांना टू बीएचके घर, चारचाकी, दुचाकी, स्मार्ट फोन जिंकण्याची संधी आहे. नेमकी काय आहे ही योजना...

पुणेकरानों आपलेच फक्त एक काम करा, अन् जिंका टू बीएचके घर, चारचाकी, दुचाकी, स्मार्ट फोन
Pune City
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 4:22 PM

पुणे : पुणे तेथे काय उणे असे का म्हटले जाते, हे नेहमी सिद्ध झाले आहे. पुणेकरांच्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या असतात. पुणेकरांच्या सवयी, खाद्यपदार्थ, संस्कृती, खेळ राज्यात सहज पोहचतात. मग पुणेकर अधिकारी असलेल्या लोकांनाही आपले वेगळेपण सिद्ध करावे लागते. आता पुणे येथील शासकीय अधिकाऱ्यांनी एक बंपर योजना आली आहे. दरवर्षी करावे लागणारे आपले एक काम केल्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

काय आहे ही योजना

पुणे महानगरपालिकेने ही योजना आणली आहे. शहरातील नागरिकांनी नियमित मिळकतकर भरल्यास महापालिकेकडून तब्बल दोन कोटींची बक्षिसे दिली जाणार आहेत. मिळकतकर वेळेवर भरणाऱ्या करदात्यांना लकी ड्रॉ द्वारे अनेक बक्षिसे देणार आहे. त्यात टू बीएचके घर, चारचाकी, दुचाकी, स्मार्ट फोन, ई-कार, ई-बाईक तसेच इतर शेकडो बक्षिसांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली आहे.

हे सुद्धा वाचा

कधीपासून मिळणार बिले

पुणे महापालिकेकडून यंदा 15 मे पासून नागरिकांना मिळकतकराची बिले दिली जातील. त्यानंतर नागरिकांनी 15 मे ते 15 जुलैपर्यंत कर भरल्यास 5 ते 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत कर भरणारे मिळकतधारकच या लकी ड्रॉ साठी पात्र असणार आहेत.

यंदा उशीर का? 

महापालिकेकडून दरवर्षी मिळकतकराची बिले 1 एप्रिलपासूनच दिली जातात. परंतु यंदा 40 टक्के सवलतीचा निर्णय शासनाकडे रखडला होता. त्यामुळे बिले तयार करण्यात आलेली नव्हती. पुणे महापालिकेस मिळणाऱ्या मिळकतकराच्या उत्पन्नातील 60 टक्के उत्पन्न आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच मिळते. त्यामुळे हे उत्पन्न अधिकाधिक वाढविण्यासाठी बक्षिसांची योजना आणली आहे.

जुलैनंतर काढणार लकी ड्रॉ

मिळकत कर भरण्याची मुदत संपल्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पात नियमीत कर भरणाऱ्या नागरिकांसाठी लकी ड्रॉ योजना जाहीर केली आहे. त्यात नशीबवान मिळकतधारकास टू बीएचके घर, चारचाकी, दुचाकी, स्मार्ट फोन यासह इतर बक्षिसे दिली जाणार आहेत. जुलैनंतर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.