पुणे महानगरपालिकेचा उत्पन्नात नवा विक्रम, आतापर्यंतचा रेकॉर्ड केला ब्रेक
पुणे शहरातील नागरिकांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी महानगरपालिकेने केली आहे. मनपाची स्थापना १९५० साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक करसंकलन यंदा झाले आहे. विशेष म्हणजे पुणे मनपात प्रशासक राज असताना कर वसुलीचा विक्रम झाला आहे.
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या विक्रमानंतर आता पुणे महानगरपालिकेने नवीन विक्रम केला आहे. मनपाच्या इतिहासात प्रथमच असा विक्रम झाला आहे. अर्थात त्याला पुणेकर नागरिकांची मिळालेली साथ आणि अधिकाऱ्यांनी केलेले काम महत्वाचे आहे. यामुळेच हा टप्पा गाठला गेला आहे. पुणे महानगरपालिकेची स्थापना १९५० साली झाली. त्यानंतर आतापर्यंत मिळालेले हे सर्वाधिक उत्पन्न आहे. विशेष म्हणजे पुणे मनपात प्रशासक राज असताना कर वसुलीचा विक्रम झाला आहे.
काय केले मनपाने
पुणे मनपाने कराच्या माध्यमातून यंदा विक्रम केला आहे. पुणे मनपा पाणीपुरवठा विभागाने कर संकलनातून १५० कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.महापालिकेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे.पुणे महानगरपालिकेचा हा विक्रम झाला आहे. आता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उत्पन्न १५० कोटी रुपयांच्यावर गेले आहे. पाणीपुरवठा विभागाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे. मागील तीन वर्षांपेक्षा यावर्षी 50 कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली.
यापूर्वी पिंपरी-चिंचवडने केला विक्रम
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने यंदा विक्रम केला आहे. मनपाने कर संकलनातून 810 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.महापालिकेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे. त्यापाठोपाठ बांधकाम विभागानेही वसुलीचा विक्रम केला आहे. त्यानंतर आता महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाही मालामाल झाला आहे. या आर्थिक वर्षामध्ये पाणीपुरवठा विभागाला तब्बल १४९ कोटी २९ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील दोन वर्षांपूर्वीच्या उत्पन्नाचा विचार करता पाणी पुरवठा विभागाने तब्बल ५० कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ
गेल्या वर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेने मिळकत कराच्या माध्यमातून 628 कोटी रुपये उत्पन्न मिळवलं होतं. यंदा त्यामध्ये 35 टक्के वाढ होत हे उत्पन्न 810 कोटीवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 182 कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळवण्यात कर संकलन विभागाला यश आले. यावर्षी हजार कोटीचे उद्दिष्ट नक्की पूर्ण करू असा विश्वास कर संकलन विभागाने व्यक्त केला.