पुणे महानगरपालिकेसंदर्भात मंत्रालयात मोठा निर्णय होणार? पुणेकरांवर होणार परिणाम
राज्यात मुंबईनंंतर पुणे हे सर्वात मोठे शहर आहे. पुणे शहराची लोकसंख्या ७४ लाखांपेक्षाही जास्त आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेवर मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी मोठा ताण पडत आहे. यामुळेच पुणे मनपाचे विभाजन करण्याच्या हालचारी सुरु झाल्या आहेत.
योगेश बोरसे, पुणे : पुणे शहराची व्याप्ती वाढली आहे. मुंबईनंतर राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर पुणे आहे. शहराची लोकसंख्या २०२० पर्यंत जवळपास ७४ लाख होती. पुणे शहराच्या जवळपास असणारी गावेही पुणे महानगरपालिकेत घेण्यात आली होती. यामुळे आधी पुणे शहर व पिंपरी चिंचवडसाठी एकच महानगरपालिका होती. त्यानंतर पुणे शहरातून पिंपरी चिंचवड मनपा वेगळी करण्यात आली. त्यानंतर काही वर्षांत पुणे मनपाचे कार्यक्षेत्र आणि लोकसंख्या वाढली. यामुळे पुणे शहरातून आणखी एक महानगरपालिका करण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. पुणे शहरातील लोकप्रतिनिधींनी आणखी एक महानगरपालिका करण्याची मागणी केली आहे.
कुठे होणार मनपा
पुण्यात आणखी एका महापालिकेसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. हडपसर – वाघोली ही महापालिका तयार करा, अशी मागणी राजकीय नेत्यांसह समाजातील काही घटकांनी केली होती. या मागणीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आता नगरविकास विभागाचं पुणे महापालिकेला पत्र मिळाले आहे. त्यावर पुणे मनपाचे विभाजन करण्यासंदर्भात महानगरपालिकेकडे अभिप्राय मागवला आहे. एका आठवड्यात अभिप्राय राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. यामुळे पुण्यात दोन महापालिका अस्तित्वात येणार का ? या प्रश्नाचे उत्तर काही दिवसांत मिळणार आहे.
ही गावे वगळली
एकीकडे पुणे महापालिकेचे विभाजन करण्याचा प्रस्ताव असताना काही गावे वगळली आहे. पुणे मनपात असणारी फुरसुंगी आणि उरुळी देवाची दोन गावं वगळली गेली आहे. मात्र या दोन गावांमध्ये महापालिकेची 200 कोटी रुपयांची मिळकत कराची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याचा पुणे मनपास अधिकार राहिला नाही. मात्र नवीन नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर नियमानुसार थकबाकी वर्ग केली जाणार आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट केलेली फुरसुंगी आणि उरूरी दोन ही गावं वगळून स्वंतत्र नगरपरिषद अस्तित्वात येणार आहे. पुणे महानगरपालिकेची स्थापना १९५० मध्ये झाली होती.
हे ही वाचा
Ratan Tata House Photos : रतन टाटा यांचे घर पहिले का? काय आहेत सुविधा जाणून घ्या?
दोन दिवस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट, गारपीट अन् अवकाळीचे संकट