पुणे पोलिसांची मोठी कारवाई, पंचतारांकीत हॉटेलमध्ये सुरु होता देहव्यापार

Pune Police : राज्यातील दोन शहरांमध्ये देह व्यापारासंदर्भातील दोन घटना उघड झाल्या आहेत. पुणे आणि नागपूरमधील मोठ्या हॉटेलमध्ये हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी कारवाई करत दलालांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात असणाऱ्या मुलींवरही कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, पंचतारांकीत हॉटेलमध्ये सुरु होता देहव्यापार
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 4:23 PM

अभिजित पोते, पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात (Pune Crime) गुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँग व गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत. पुणे शहरातील काही भागात देहव्यापारही सुरु आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरु असल्याचे प्रकार उघड झाले होते. आता पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा (Prostitution) भांडाफोड केला आहे. एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हा प्रकार सुरु होता.

विशेष पथकाचा छापा

पुण्यात पोलिसांनी एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांच्या विशेष पथकाने वेश्या व्यवसायात सहभागी असलेल्या दोन मुली आणि तीन दलालांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई झाली.

हे सुद्धा वाचा

कोणी केली कारवाई

या संदर्भात पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाचे अधिकारी तुषार भिवरकर आणि अमित जमदाडे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 370, 34 आणि अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायद्याच्या कलमांखाली बंडगार्डन पोलिस ठाण्यात तीन एजंटांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रवींद्रकुमार तुलशी यादव, आनंदकुमार सुक्कर यादव, अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.

नागपूरमध्ये घटना उघड

नागपुरातील एका स्टार हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भंडाफोड केला आहे, याप्रकरणी दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. एका उजबेकिस्तानच्या तरुणीसह दिल्लीच्या 2 तरुणींनीची सुटका केली आहे.

नागपूरच्या वर्धा मार्गावर असलेल्या एका पॉश हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलमध्ये सापळा रचून 2 दलालांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये बिलाल अहमद आणि राजकुमार गडेलवार यांचा समावेश आहे. व्हाटसॲपच्या माध्यमातून हे दलाल ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना तरुणी उपलब्ध करून द्यायचे. या प्रकरणी उजबेकिस्तान येथून आलेली एक तरुणी आणि दिल्ली येथील 2 तरुणींची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.