पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत काय आहे मोठा अडथळा?

रेल्वे अधिकाऱ्यांनी जीएमआरटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. जेव्हा रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल तेव्हा सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल.

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत काय आहे मोठा अडथळा?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 10:34 AM

पुणे : पुणे-नाशिककरांसाठी सेमी हास्पीड रेल्वे सुरु होणार आहे. यामुळे पावणेदोन तासांत नाशिकहून थेट पुण्याला (Nashik) आणि पुण्याहून नाशिकला पोहचता येणार आहे. यासाठी नाशिक-पुणे (Pune) सेमी हायस्पीड रेल्वे  प्रकल्पाला (railway) नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली. परंतु यासंदर्भात एक मोठा अडथळा आहे. हा अडथळा दूर करणे हे महाराष्ट्र रेल्वे इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (Maharashtra Rail Infrastructure Development Corporation) म्हणजेच महारेलसाठी एक आव्हान असणार आहे. या संदर्भात महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, पुणे-नाशिक रेल्वे लाईनसाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेणार आहोत. लवकरच या समस्येवर उपाय काढला जाईल.

काय आहे अडथळा

हे सुद्धा वाचा

पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्राची तत्वतः मान्यता मिळाली. परंतु पुणे येथील नारायणगावजवळ असणाऱ्या जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलीस्कोप (GMRT) 30 हा योजनेसाठी मोठा अडथळा आहे. ही रेल्वेलाईन टेलीस्कोपच्या अँटेनाजवळून जाते. यामुळे जीएमआरटीच्या वैज्ञानिकांच्या कामकाजात अडचण निर्माण होणार आहे.

जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलीस्कोप पुणे शहरापासून 80 किलोमीटरवर आहे. हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी निवडलेला मार्ग नारायणगावमधून जातो आणि केंद्राच्या अँटेनापासून 15 किलोमीटरच्या आत आहे. तर काही अँटेनाच्या अगदी जवळ आहेत. एका अँटेनापासून रेल्वे लाईन फक्त एक किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. हा टेल्सीस्कोप 150-1420 Hz वर चालते. यात प्रत्येकी 45 मीटर व्यासाचे 30 अँटेना लावले आहेत. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (NCRA) द्वारे चालवले जातात.

काय असणार धोका

सेमी हायस्पीड रेल्वेत पेंटोग्राफ असतो. पेंटोग्राफ म्हणजे रेल्वेत विद्युत प्रवाह निर्माण करणारे यंत्र आहे. पेंटोग्राफ उच्च क्षमतेच्या रेल्वे तारांना स्पर्श करुन विद्युत प्रवाह तयार करतो. यामुळे आगीच्या ठिणग्या बाहेर पडतात अन् रेडिएशन बाहेर पडतात. त्याचा परिणाम टेलीस्कोपवर होणार आहे.

रेल्वेशी चर्चा सुरु

एनसीआरएचे संचालक यशवंत गुप्ता म्हणाले की, केंद्राने यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. दुसरीकडे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी सांगितले की, रेल्वे अधिकाऱ्यांनी जीएमआरटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. जेव्हा रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल तेव्हा सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल.

अनेक वर्षांपासून पाठपुरावा

देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली. आता सेमी हास्पीड रेल्वेच्या प्रकल्पासाठी आवश्यक 1 हजार 450 हेक्टरपैकी 30 हेक्टरपेक्षा अधिक खासगी जमीन संपादीत केली गेली आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही माहिती देण्यात आली. प्रकल्पासाठी सरकारी आणि वन जमीन संपादनाचीही प्रक्रिया सध्या सुरू आहे.

कसा असणार मार्ग

  • राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुमारे १६ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प
  • रेल्वेमार्ग २३५ किलोमीटर लांबीचा असणार
  • पुणे – अहमदनगर – नाशिक या तीन जिल्ह्यांना हा प्रकल्प जोडणार
  • २०० किलोमीटर प्रतितास वेगाने सेमी हायस्पीड रेल्वे धावणार
  • पुणे ते नाशिक हे २३५ किलो मीटरचे अंतर अवघ्या पावणेदोन तासात कापता येणार
  • पुणे – नाशिकदरम्यान २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल व १२८ भुयारीमार्ग प्रस्तावित
  • भूसंपादन झाल्यानंतर विद्युतीकरणासह एकाचवेळी दुहेरी मार्गाचे काम होणार
  • पुणे ते मांजरी एलिव्हेटेड म्हणजेच पुलावरुन ही रेल्वे धावणार
  • मांजरी ते नाशिक जमिनीवरून हायस्पीड रेल्वे धावणार
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.