पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेनसाठी वेगवान हालचाली, मुरलीधर मोहोळ अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव…

पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेन, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, पुणे-अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवे टर्मिनल आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेनसाठी वेगवान हालचाली, मुरलीधर मोहोळ अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव...
vande bharat expressImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 1:09 PM

राज्यात वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत. राज्यातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईवरुन गांधीनगर सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-गोवा, मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-जालना या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. पुणे शहरातून स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस अजून सुरु झालेली नाही. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरुन जाते. परंतु आता पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेनसाठी वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात केंद्रीय नागरिक उड्डयन आणि सहकार राज्यमंत्री मुरलधीर मोहोळ यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांची भेट घेतली. त्या भेटीत पुण्यावरुन वंदे भारत स्लिपर ट्रेन, वंदे मेट्रो ट्रेनबाबत चर्चा झाली. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुणे-दिल्ली स्लिपर वंदे भारत ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे.

अशी झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

रेल्वेच्या पुणे आणि विभागातील विविध प्रलंबित विषय मार्गी लावण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावतानाच पुण्यातून वंदे भारत ट्रेन सुरु कराव्यात, यावर सकारात्मक चर्चा झाली. विशेष म्हणजे वैष्णव यांनी प्रलंबित विषय मार्गी लावण्यासंदर्भात प्रत्यक्ष नकाशावर सविस्तर माहिती दिली.

vande bharat sleeper coach

vande bharat sleeper coach

रेल्वे मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेचे अनेक विषय गेली काही वर्षे प्रलंबित आहेत. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा, यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी पुढाकार घेतला आहे. प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवल्याने हे विषय लवकरच मार्गी लागणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचा विस्तार

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेन, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, पुणे-अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवे टर्मिनल आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व विषयांवर वैष्णव यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच आगामी काळातील कृती आराखड्याबाबतही चर्चा केली.

वंदे मेट्रो सेवा लवकरच

गुरुवारी लोकसभेतील भाषणात रेल्वेमंत्र्यांनी देशातील महत्वाच्या महानगरांना जोडणारी वंदे भारत मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. या अनुषंगाने पुण्याहून नाशिक, मुंबई, सोलापूर, नागपूर या महानगरांसाठी वंदे भारत मेट्रोचा विचार व्हावा, या संदर्भातही चर्चा केली, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....