थकून भागून घरी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला, भरधाव कार थेट अंगावर आली; तिघांचा मृत्यू

नगर-कल्याण महामार्गावरील अपघाताची मालिका अजूनही थांबलेली नाही. या महामार्गावर काल रात्री भीषण अपघात झालाय. हा अपघात प्रचंड मोठा होता. अपघातात तीन मजूर ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

थकून भागून घरी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला, भरधाव कार थेट अंगावर आली; तिघांचा मृत्यू
car crashes Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 9:23 AM

रणजित जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 25 सप्टेंबर 2023 : काळ कुणावर कधी घाला घालेल याचा काही नेम नाही. कुणाचा मृत्यू कधी होईल हेही सांगता येत नाही. फक्त निमित्त घडतं आणि मृत्यू ओढवतो. असं काही घडेल असं कुणाच्या ध्यानीमनीही नसतं. त्या पाच मजुरांच्या बाबतीतही तसंच घडलं. दिवसभर शेतात राबले. अगदी रात्री उशिरापर्यंत काम केलं. थकल्यानंतर अखेर त्यांनी घरी जायचा निर्णय घेतला. अंधारातून वाट काढत घराकडे जात असताना एक भरधाव कार त्यांच्या अंगावर चढली अन् पाचपैकी तीन मजुरांचा मृत्यू झाला. सर्व काही संपलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील नगर- कल्याण मार्गावर हा भीषण अपघात झाला. कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिरा जवळील कठेश्वरी पुलाजवळ हा भीषण आणि हृदयाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. शेतातून काम आटोपून हे पाचही तरुण घराकडे जायला निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने या पाच मजुरांना चिरडले. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन जखमींवर आळेफाटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्व मजूर परप्रांतिय

हे सर्व मजूर परप्रांतिय आहेत. काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून काम करण्यासाठी ते आले होते अशी माहिती समोर आली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत मजुरांची नावे आहेत. काल रात्री 8 ते 8.15च्या दरम्यान हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.

काय घडलं नेमकं?

पाचही मजूर दोन ते तीन दिवसापूर्वीच मध्यप्रदेशादून डिगोरे येथे आले होते. शेतात काम करण्यासाठी ते आले होते. मात्र काल संध्याकाळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. दिवसभर शेतात राबल्यानंतर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघाले असताना महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकी क्र एम एच 12 व्ही क्यू 8909 ही भरधाव वेगात आली. या कारने पायी चालणाऱ्या या पाचही मजुरांना चिरडले. त्यातील दोन मजूर जागीच ठार झाले.

एक मजूर गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली आहे. या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

गतिरोधक उभारा

नगर-कल्याण महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण या महामार्गावर मृत्यूमुखी पडले असून त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतो की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. अपघातांवर नियंत्र यावं म्हणून या महामार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.