चार राज्यांमधील लोकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा शोध लागला, लोकांना गंडवण्यासाठी वापरला वेगळा फार्मूला

Pune News Cyber Fraud : ऑनलाइन फसवणुकीचे रोज अनेक प्रकार उघड येत आहे. भामटे नवनवीन आयडीया शोधून लोकांची फसवणूक करत आहे. या प्रकरणी अटक केल्या दहा जणांच्या टोळीकडून धक्कादायक खुलासा मिळाला आहे.

चार राज्यांमधील लोकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा शोध लागला, लोकांना गंडवण्यासाठी वापरला वेगळा फार्मूला
सायबर क्राईम Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 2:41 PM

पुणे : ऑनलाईन कामे आता गरज झाली आहे. परंतु ही कामे करताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. अगदी सोपे दोन तीन नियम पाळले तरी फसवणूक होऊ शकत नाही. सध्या अनेक ऑनलाईन फ्रॉड करणारे लोक वेगवेगळ्या आयडीया वारत आहे. मग त्यांच्या तावडीत तुम्ही एकदा सापडला तर तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागेल. सध्या ऑनलाईन फसवणुकीची रोज अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. आता घर भाड्याने देण्याचे निमित्ताने ऑनलाईन फसवणूक करणारी एक टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे. या टोळीने तब्बल ६० जणांची फसवणूक केली आहे. चार राज्यातील पोलीस तिच्या शोधत होते.

असे सुरु झाले ऑपरेशन सुरक्षा यंत्रणांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने लष्कराचे जवान बनून जवळपास 60 लोकांना फसवले आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांचे पोलीस या टोळीच्या शोध घेत होते. यासंदर्भात साऊथ आर्मी कमांडच्या पुणे स्थित मिलिटरी इंटेलिजन्स (MI) युनिटने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर या टोळीला पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू झाले.

सूत्रधारास पकडले कुख्यात सायबर गुन्हेगार संजीव कुमार (३०) हा या टोळीचा सूत्रधार आहे. त्याला पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर येथून अटक केली. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान पोलिसांच्या संयुक्त पथकांनी त्याची चौकशी केली. चौकशीनंतर हरियाणातील कैथल जिल्ह्यातील नूह आणि डीग येथे छापे टाकण्यात आले. या छाप्यात नऊ जणांना अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

असे करत होते फसवणूक घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने किंवा काही वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याच्या बहाण्याने हे लोकांना फसवत होते. लष्करात कार्यरत असलेला जवान दीपक बजरंग पवार याच्या नावाने त्यांनी बनावट ओळखपत्रे केली होती. आधी लोकांचा विश्वास संपादन करत होते. मग घर भाड्याने देण्यासाठी किंवा काही वस्तू खरेदी करण्याच्या व्यवहाराची पडताळणी करण्यासाठी काही रुपये मागवत होते. त्यानंतर तांत्रिक समस्येचे कारण देत OTP किंवा QR कोड मागात होते. एका त्यांना ओटीपी मिळाले की बँक खाते रिकामे केले जात होते.

अनेक मोबाइल जप्त अनेक सिम कार्ड, मोबाइल फोन आणि बँक खात्यांचे ते वापर करत होते. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र, संरक्षण विभागाच्या कॅन्टीनचे कार्ड, पॅन नंबर, आधार कार्ड, तीन डझन मोबाइल, 206 सिम कार्ड आणि सात लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.

हे ही वाचा

चीनमध्ये बसून मुंबई पोलिसांच्या नावाने फसवणूक, पाच मिनिटांत बँक खाते रिकामे, काय आहे प्रकार?

बारावी पास, रोजची कमाई ५ ते १० कोटी, बँक खाते पाहून मुंबई पोलीस झाले हैराण

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.