बगाड यात्रा सुरु असताना भीषण अपघात, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात बंद, पाहा Video

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेत बगाडाला यात्रा आयोजित केली होती. यंदाही यात्रेचे आयोजन केले होते. यात्रेचा उत्साह सुरु असताना अचानक अपघात झाला. यामुळे सर्वांची घबराट उडली. अपघाताच थरार कँमेरात कैद झाला आहे.

बगाड यात्रा सुरु असताना भीषण अपघात, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात बंद, पाहा Video
Pune yatra
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 10:41 AM

रणजित जाधव, जुन्नर, पुणे : महाराष्ट्रात प्रत्येक सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. राज्यातील अनेक ठिकाणी बगाड यात्रा आयोजित केली जाते. या यात्रेसाठी बगाडाची बांधणी केली जाते. बगाड मार्गाची स्वच्छता करण्यात येते. यात्रेसाठी मोठा उत्साह असतो. गावातील हजारो ग्रामस्थ यात्रा पाहण्यासाठी जमत असतात. यात्रेच चांगलाच थरर असल्याने युवकांचा उत्साह मोठा असतो. या यात्रेनिमित्त परिसरातून नागरिकही पारुंडे येथे येत असतात. यंदा जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेत गाडी-बगाडाला यात्रा आयोजित केली होती. यात्रेचा उत्साह सुरु असताना अपघात झाला. यामुळे सर्वांची घबराट उडली. या अपघाताच थरार कँमेरात कैद झाला आहे.

काय असते बगाड यात्रा

जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेत गाडी-बगाडाला यात्रा सुरु होती. यावेळी भीषण अपघात झालाय.या अपघाताच थरार कँमेरात कैद झालाय. बगाड म्हणजे एका खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने लटकावून माणसाची काढलेली मिरवणूक.. ज्याला नवस फेडायचा आहे त्यांने, किंवा त्याच्या वतीने दुसरा कुणीतरी बगाडस्वार होऊ शकतो. नेहमीप्रमाणे पारुंडेत हा कार्यक्रम सुरु होता. बगाड यात्रा सुरु असताना बगाड मधोमध तुटला. या दुर्घटनेत दोन्ही बाजूचे वीर उंचावरून जमीनीवर पडून जखमी झाले आहेत.

जखमींना नेले रुग्णालयात

बगाडस्वार खाली पडल्यानंतर सर्वांची धावपळ उडली. ग्रामस्थांनी लागलीच धाव घेत त्यांना रुग्णालयात नेले. या घटनेत एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी आहे. सुनील चिलप व संदीप चिलप बगाड हे दोघे या बगाडाला लटकलेले होते. त्य दरम्यान मिरवणूक पारुंडे येथील चौकात आल्यावर बगाड मध्यभागी तुटले आणि दोघेही जमिनीवर उंचावरून जोरदार आपटले.

जखमींना नेणार मुंबईला

या अपघातात सुनील चिलप यांच्या बरगड्याना जबर मार लागला आहे. त्यांच्यावर नारायणगाव येथील खाजगी रुगणालायत प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संदीप चिलप यांना उपचार करून घरी सोडले आहे.

हिंडवाडीत असतो उत्साह

हिंजवडी वाकडकरासह पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्ताने काढलेल्या पारंपारिक बगाड मिरवणुकीला अथांग जनसागर लोटतो. पाच दिवस चालणार्‍या या उत्सवाचे बगाड मिरवणूक हे खास आकर्षण असते. हिंजवडी वाकड मध्ये शहरीकरण झाले असले तरी येथील शेकडो शेतकर्‍यांनी आवड म्हणून घरी खिल्लारी बैल पाळले आहेत. यातील काहीजण बैलगाडा शर्यतीत तर काहीजण पंढरपूर च्या पायी वारीतील रथाला आपल्या बैलजोड्या जुंपतात. मात्र न चुकता सजवलेल्या बैलजोड्या बगाड मिरवणूक रथाला जोडल्या जातात.

वाचा सविस्तर

हिंजवडी आयटी पार्क झाले म्हणून काय झाले, आमचा हा 388 वर्षांचा उत्सव पाहाच

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.