राजकारणात चर्चा तर होणारच, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गँगस्टराची पत्नी भाजपमध्ये दाखल

Gangster Sharad Mohol : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पक्षप्रवेश होत आहे. आता भारतीय जनता पक्षामध्ये गँगस्टरच्या पत्नीचा प्रवेश झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला आहे. त्यावरुन चर्चा सुरु झाली आहे.

राजकारणात चर्चा तर होणारच, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गँगस्टराची पत्नी भाजपमध्ये दाखल
sharad mohal and his wife
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 11:29 AM

पुणे : राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे, अशी टीका वारंवार होत असते. सर्वच राजकीय पक्षांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदचा वापर केला जातो. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांचे प्रवेश पक्ष सोहळे होतात. आता पुणे शहरातील राजकारणातून अशीच एक मोठी बातमी आली आहे. मकोका अन् अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपीच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. आता यावर राजकीय पक्षांमधून काय प्रतिक्रिया उमटणार? हे येत्या काळात दिसून येईल.

कोणी केला प्रवेश

कसबा पेठेतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. यामुळे आगामी मनपा निवडणुका पाहता पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बडे नेते शाम देशपांडे यांचा भाजपात प्रवेश झाला होता. आता गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीला चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश दिला गेला आहे. स्वाती मोहोळ भाजपमध्ये प्रवेश करणार यासंदर्भात चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. आता महापालिका आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाती मोहोळ यांचा भाजप प्रवेश झाल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी झाला होता प्रयत्न

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर 2021 मध्ये भाजपच्या एका कार्यक्रमाला गुंडाच्या पत्नींनी हजेरी लावली होती. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. या कार्यक्रमात स्वाती मोहोळ यांचाही सहभाग होता. त्यावेळी चंद्रकात पाटील यांनी हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

कोण आहे शरद मोहोळ

शरद मोहोळ सध्या येरवडा कारागृहात आहे. कारागृहात असताना त्याने दहशतवादी कातील सिद्दीकीचा खून केला होता. त्याच्या विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, आणि पुणे ग्रामीण परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मकोका ही लावण्यात आला आहे.

भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी यावेळी बोलताना सांगितले की, स्वाती मोहोळ यांच भाजपात स्वागत करतो. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. त्यांनी कोथरूड परिसरात चांगलं काम केले आहे. त्या भाजपात आल्यानंतर भाजपची ताकद वाढणार आहे. पुण्यात अनेकजण भाजपमध्ये पक्षात घेण्यासाठी इच्छुक आहेत. पक्ष झपाट्याने वाढत आहे.

हे ही वाचा

पुणे शहरातील लोकांना काय आवडते | देशी मद्य, विदेशी मद्य, वाईन की बियर?

पुणेकरांना मंत्रिमंडळाची मोठी भेट, वर्षभरात होणार मोठी बचत

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.