IPL चा थरार सुरु असताना पुणे शहरात सट्टेबाजीचा बाजार
क्रिकेटप्रेमी आयपीएलचा रोमांच अनुभवत आहेत. गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्याचा थरार सुरु असताना पुणे शहरात सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
रणजित जाधव, पुणे : IPLचा थरार सध्या रंगलेला आहे. क्रिकेटप्रेमी आयपीएल सामने पाहत आनंद लुटत आहे. त्याचवेळी बुकीही सक्रीय झाले आहेत. त्यांनी IPL च्या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी सट्टाबाजार मांडला आहे. या बुकींवर कारवाईसाठी पोलिसांच्या टीमने लक्ष्य केंद्रीत केले आहे. पुणे शहरात आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या जाळ्यात आले आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्याचा थरार सुरु असताना सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कुठे सुरु होता प्रकार
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू वसाहतीमध्ये बंद फ्लॅटमध्ये सट्टा घेण्याचे काम बुकी करत होते. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटने छापा टाकला. त्याठिकाणी पाच बुकींना अटक करण्यात आली. त्यांच्यांकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आले. लॅपटॉप अन् मोबाईलच्या माध्यामातून ते सट्टा लावत होते. गोविंद प्रभुदास लालवानी, कन्हैयालाल सुगुणमल हरजानी, देवानंद प्रतापराय दरयानी, रमेश दयाराम मीरानी आणि हरेश हनुमंत थटाई अशी आरोपींची नावे आहेत.
आणखी मोठे मासे मिळणार
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने कारवाई केली होती. त्यानंतर चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यांत सामना सुरु असताना पुणे शहरातील कोंढवा परिसरातील ब्रह्मा अंगण बिल्डिंगमध्ये कारवाई झाली होती. या ठिकाणी बुकी आयपीएलवर सट्टा घेत असताना सापडले होते. आता पिंपरी चिंचवडमध्ये कारवाई झाली आहे. या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असल्यामुळं पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. आरोपींकडून 14 मोबाईल एक लॅपटॉप दोन वायफाय आणि रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
हे ही वाचा
बायकोशी झालेल्या भांडणामुळे पोलिसांची धावपळ, बीडीडीएसचे पथक विमानतळावर