पुणे शहरातील ISIS प्रेमी डॉक्टर स्लीपर सेल तयार करत होता, NIA रिपोर्टमध्ये काय, काय आहेत दावे

Pune Crime News : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे चिंता निर्माण झाली आहे. पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र होत आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे. एनआयएने एका डॉक्टरावर कारवाई केली आहे.

पुणे शहरातील ISIS प्रेमी डॉक्टर स्लीपर सेल तयार करत होता, NIA रिपोर्टमध्ये काय, काय आहेत दावे
adnan ali sarkar puneImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 12:30 PM

पुणे | 29 जुलै 2023 : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात डॉ.अदनान अली सरकार याला अटक केली आहे. ISIS प्रेमी डॉक्टर अदनान अली सरकार भारतात युद्धासारखी परिस्थिती निर्माण करत होता. दहशतवाद्यांचा इशाऱ्यावर गजवा-ए-हिंदसारखा कट भारतात तयार करण्याचा प्रयत्न डॉ.सरकार करत होता. पुणे शहरात अटक झालेला सरकार हा चौथा व्यक्ती आहे. ज्याचा संबंध दहशतवादी कारवायांशी आलाय. यामुळे दहशतवाद्यांची पाळेमुळे पुणे शहरात खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पोलिसांसह तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

ISIS साठी स्लीपर सेल

स्लीपर सेल ही अतिरेक्यांसाठी काम करणारी यंत्रणा आहे. स्लीपर सेलमध्ये काम करणारे सामान्यांप्रमाणे दिसतात. त्यांच्यात राहतात. परंतु अतिरेक्यांकडून आलेल्या इशाऱ्यानंतर ते काहीही करण्यास तयार होतात. ही यंत्रणा पुण्यात तयार करण्याचे काम डॉ.अदनान सरकार करत होता.

अदनान सरकार याचे कोणावर होते लक्ष

एनेस्थीसियामध्ये एमडी झालेला अदनान सरकार याचे टार्गेट युवक होते. आर्थिकदृष्या कमकुवत असणाऱ्या युवकांना शोधून त्यांना दहशतवादी तो बनवत होता. त्यासाठी त्या युवकांना पैशांची लालसा दाखवत होता. अदनान सरकार भारताच्या एकता, अखंडता आणि स्थिरतेसाठी धोका निर्माण करत होता. ISIS चा ‘महाराष्ट्र मॉड्यूल’ चा तो मोठा चेहरा होता, असे एनआयएचा रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

एनआयकडून पाचवी अटक

एनआयएने ‘महाराष्ट्र मॉड्यूल’ प्रकरणात 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 3 जुलै रोजी मुंबईमधून तीन जणांना अटक केली होती. त्यावेळी पुणे शहरात छापा टाकून एकाला अटक केली होती. आता डॉ.सरकारच्या माध्यमातून ही पाचवी अटक आहे.

कोंढवा केंद्रस्थानी

अदनान सरकार याला कोंढव्यातून अटक केली आहे. तपास संस्थांनी गेल्या वर्षभरात पकडलेल्या दहशतवाद्यांपैकी बहुसंख्य आरोपी कोंढव्यात वास्तव्यास होते. यामुळे कोंढव्यासह दापोडी, बोपोडी या ठिकाणी स्लिपर सेल सक्रिय आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोंढवा भागातील दाट वस्तीत या लोकांचा शोध घेणे यंत्रणांसाठी आव्हानात्मक बनले आहे.

ही ही वाचा

भूलतज्ज्ञ असलेला डॉक्टर, अनेक भाषांचे ज्ञान पण निघाला ‘इसिस’ समर्थक, NIA कडून अटक

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.