तिहेरी हत्याकांडामुळे पुणे हादरले, दिराने वहिनी अन् मुलांना संपवले

पुणे शहर तिहेरी हत्याकांडाने हादरले आहे. पुण्यात महिला आणि तिच्या दोन मुलांची हत्या नातेवाईकाकडूनच झाली आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

तिहेरी हत्याकांडामुळे पुणे हादरले, दिराने वहिनी अन् मुलांना संपवले
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 10:29 AM

पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पुणे शहर तिहेरी हत्याकांडानं हादरलं आहे. हे हत्याकांड एकाच कुटुंबातील आहे.  सख्ख्या दिरानेच आपली वहिनी आणि तिच्या दोन चिमुकल्यांची हत्या केलीय. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. आरोपीने त्याची २५ वर्षीय वहिनी अन् तिच्या ४ आणि ६ वर्षीय मुलाची हत्या केल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रूर कृत्यानंतर मृतदेह जाळले

३० वर्षीय आरोपीचे तिच्या वहिनीशी अनैतिक संबंध होते. मात्र आरोपीला तिच्या वहिनीचे आणखी कोणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्यांच्यामध्ये वाद झाला. वादानंतर रागाच्या भरात त्याने वहिनीला आणि तिच्या सहा अन् चार वर्षांच्या मुलीस संपवले. त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या तिघांचे मृतदेह घरातील कपडे, बेडशीट व लाकडच्या साह्याने पेट्रोल टाकून जाळले. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान 302 व 201 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा

दोन महिन्यापूर्वी मुलाने मोबाईलसाठी केली आईची हत्या

पुण्यासारख्या सुस्कृतिक शहरात किरकोळ करणांवरुन हत्येचा प्रकार वाढत आहे. फेब्रवारी महिन्यात मुलाने आई मोबाईल देत नाही म्हणून तिची हत्या केली होती. पुणे जवळील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत हा प्रकार घडला होता. तस्लीम शेख या महिलेची हत्या झाली होती.

हे ही वाचा

मोबाईलच्या व्यसनाने हे काय केले, संतापाच्या भरात मुलाने केला आईचा खून

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.