नियमांचे उल्लंघन, पुण्यातील या मोठ्या बँकेला RBI ने केला दंड

Pune News : भारतीय रिझर्व्ह बँकेने चार बँकांना दंड केला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या या बँकांना दंड करण्यात आला आहे. त्यात पुण्यातील एका सहकारी बँकेचा समावेश आहे. पुण्यातील बँकेला १३ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आलाय.

नियमांचे उल्लंघन, पुण्यातील या मोठ्या बँकेला RBI ने केला दंड
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 4:58 PM

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चार सहकारी बँकांना दंड केला आहे. या चार बँकांना एकूण 44 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या बँकांना दंड करण्यात आला आहे. या चार बँकांमध्ये पुणे येथील एका बँकेचा समावेश आहे. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ठेवांवर व्याज दर’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल पुणे शहरातील सहकारी बँकेला दंड केला आहे.

कोणाला केला दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने चेन्नई येथील तामिळनाडू स्टेट एपेक्स को-ऑपरेटिव्ह बँकेला 16 लाखांचा दंड केला आहे. याशिवाय आरबीआयने बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेला दंड केला आहे. पुणे येथील जनता सहकारी बँक आणि राजस्थानमधील बारन येथील बरण नागरीक सहकारी बँक या तीन बँकांनाही दंड ठोठावला आहे.

हे सुद्धा वाचा

कशासाठी केला दंड

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेला १३ लाखांचा दंड केला गेला आहे. एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF) मध्ये मुदतीत रक्कम टाकली गेली नाही. ‘ठेवांवर व्याज दर’ या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल पुणे येथील जनता सहकारी बँकेला 13 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तामिळनाडू स्टेट एपेक्स को-ऑपरेटिव्ह बँकेला हा दंड ठोठावण्यात आला आहे. कारण बँकेने रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडमध्ये निर्धारित कालावधीत हस्तांतरित केली नाही. नाबार्डला फसवणुकीचा अहवाल बँकेला ठराविक मुदतीत दिला नाही. तसेच काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बरण नागरीक सहकारी बँक, बारण राजस्थानला 2 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.

तर होते कारवाई

रिझर्व्ह बँकेने काही नियमावली घालून दिली आहे. त्याचे पालन सर्वप्रकारच्या बँकांना करणे बंधनकारक आहे. बँकेच्या व्यवहारांवर केंद्रीय बँकेचे बारीक लक्ष असते. बँकांना व्यवहारांची आणि लेख्याजोख्याची माहिती सादर करावी लागते. या तरतुदींमध्ये काही विसंगती आढळल्यास रिझर्व्ह बँक कारवाई करते.

रिझर्व्ह बँकही आपल्या देखरेखीखाली बँकांच्या आर्थिक स्थितीची माहिती घेते.एखाद्या बँकेची स्थिती बिकट असल्याचे दिसले आणि ग्राहकांचे पैसे बुडण्याचा धोका असेल, तर रिझर्व्ह बँक त्या बँकेवर निर्बंध घालू शकते. तसेच, ग्राहकांना पैसे काढण्याची मर्यादा घालून देते. अशा प्रकारची कारवाई वेळोवेळी होत असते.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.