कविता शर्मा, रिया शर्मा, गीता शर्मा, प्रिया शर्मा, सीता शर्मा, यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका!
सर्व सोशल माध्यमं किती असुरक्षित आहेत याचं जिवंत उदाहरण पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी परिसरात समोर आलं आहे.
पुणे : ऑनलाईन व्यवहारात अनेक धोके समोर येत असतानाच आता ऑनलाईन प्रेम प्रकरणातून अनेकदा धोकाच मिळत असल्याची मोठी आता प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. आशाच घटना आता पिंपरी चिंचवडच्या कासारवाडी, भोसरी परिसरात समोर आल्या आहेत. या ठिकाणीच्या जवळपास 10 ते 12 मुलांना ऑनलाईन प्रेमाने असाच धक्का दिला आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहुयात… (pune online fraud beware if unknown friend request comes on FB account)
आपल्या दैनंदिन जीवनात फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा अनेक सोशल साईडवर सर्व व्यस्त असल्याचं दिसत आहे. मात्र, ही सर्व सोशल माध्यमं किती असुरक्षित आहेत याचं जिवंत उदाहरण पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी परिसरात समोर आलं आहे. या ठिकाणी फेसबुकवर आता कविता शर्मा, रिया शर्मा, गीता शर्मा, प्रिया शर्मा, सीता शर्मा या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट येऊ लागल्या आहेत. अशा फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हालाही येत असतील तर सावधान.
फ्रेंड रिक्वेस्टनंतर तासनतास गप्पा
पिंपरी चिंचवडच्या कासारवाडीमधला एक 20 वर्षीय तरुण आहे. त्याला काही दिवसांपूर्वी कविता शर्मा नावाच्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती स्वीकारली. नंतर ती मुलगी त्याच्याशी तासनतास गप्पा मारू लागली. नंतर तीने त्याचा व्हॉट्सअॅप नंबर मिळवला. प्रेमात बुडाल्याचे नाटक करत मुलाला व्हीडिओ सेक्सचे आमिष दाखवले आणि मुलगा त्यात फसला की तुझा व्हीडिओ रेकॉर्ड केला आहे. पैसे दे असे कॉल त्या मुलाला सुरू झाले.
हा एकच तरुण नाही तर कासारवाडीमधल्या जवळपास 12 मुलांना गेल्या आठवडाभरात अशा प्रकारे फसवण्यात आलं आहे. सामाजिक दडपणामुळे ही मुलं तक्रार करायला पुढे येत नव्हती. पण तरीही फसवणूक झालेल्या 2 जणांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. अचानकपणे वाढलेल्या या प्रकारामुळे सायबर सेलकडून तरुणांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
फक्त पिंपरी चिंचवडच नाहीतर कोणत्याही शहरात अशाच पद्धतीने तरुणांना फसवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रेमाच्या भानगडीत पडून प्रत्यक्षात अडचणीत येण्यापेक्षा अलर्ट राहणं गरजेचं आहे. (pune online fraud beware if unknown friend request comes on FB account)
संबंधित बातम्या –
बेपत्ता पत्नी साडेतीन वर्षांनी प्रियकरासोबत सापडली, शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा
पुण्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाच्या हत्येची सुपारी, राजकीय वर्तुळात खळबळ
पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार, स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग 1 जानेवारीपासून खुला
(pune online fraud beware if unknown friend request comes on FB account)