5 तोळे सोने ते जॅपनीज झाडांपासून बनविलेले उरुशी पेन, इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये जगविख्यात पेन पाहण्याची संधी

पुणे : इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये तुम्हाला असे पेन पाहता येणार आहेत, जे तुम्ही कधीच बघितले नसतील, तब्बल 6 लाखांचा 18 कॅरट गोल्डपासून बनविलेला 5 तोळ्यांचा चमचमचा बाॅलपेन, दुबई शहर साकारलेला संपूर्ण चांदीचा पेनही इथे पाहता येणार आहे. जगभरात मोजके म्हणजे केवळ 516 पेन असलेला शुद्ध चांदीपासून बनविलेला अडीच लाखांचा पेनही आहे. जॅपनिज झाडांपासून बनविलेला आणि […]

5 तोळे सोने ते जॅपनीज झाडांपासून बनविलेले उरुशी पेन, इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये जगविख्यात पेन पाहण्याची संधी
pen festival
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 7:54 PM

पुणे : इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये तुम्हाला असे पेन पाहता येणार आहेत, जे तुम्ही कधीच बघितले नसतील, तब्बल 6 लाखांचा 18 कॅरट गोल्डपासून बनविलेला 5 तोळ्यांचा चमचमचा बाॅलपेन, दुबई शहर साकारलेला संपूर्ण चांदीचा पेनही इथे पाहता येणार आहे. जगभरात मोजके म्हणजे केवळ 516 पेन असलेला शुद्ध चांदीपासून बनविलेला अडीच लाखांचा पेनही आहे. जॅपनिज झाडांपासून बनविलेला आणि सोने तसेच प्लॅटीनम पावडरमध्ये नक्षीकाम केलेला उरुशी पेनही इथे पाहता येणार आहेत. सोन्याची निब असलेला दीड लाखांचा डिप्लोमॅट पेन त्यासोबतच सुंगधी शाई, सोन्याची पावडर असलेली शाई असे पेन आणि शाईचे विविध प्रकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे.

पुण्यात इंटरनॅशनल पेन फेस्टीवल

पुण्यामध्ये इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे आयोजन आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे व्हिनस ट्रेडर्सतर्फे करण्यात आले. फेस्टीवलचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, फ्लेअर पेनचे चेअरमन खुबीलाल राठोड, कुमार प्रॉपर्टीजचे केवलकुमार जैन, न्युरोलॉजिस्ट डॉ. राजस देशपांडे, पीएनजीचे सौरभ गाडगीळ, सुरेंद्र करमचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते. पार्कर, वॉटरमन, मॉन्टब्लँक जर्मनी, वॉल्डमन, शेफस, मॉन्टव्हर्दे, स्क्रिक्स टर्की, लॅमी जर्मनी, पायलट, प्लॅटिनम, फ्लेक्सबुक ग्रीस, लिओनार्डो, मॅग्ना कार्टा या आणि अशा जगविख्यात तब्बल 2 हजारापेक्षा अधिक पेन प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

200 रुपयांपासून ते 6 लाखांपर्यंत पेन

फेस्टीवलमध्ये २०० रुपयापासून ते 6 लाख रुपये किमतीचे पेन असून फाउंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन, मल्टीफंक्शनल पेन, कॅलिग्राफी पेन,यांत्रिक पेन्सिल, शाईची विविध ५०० श्रेणी पेन फेस्टीवलमध्ये आहेत. यावेळी सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, आजच्या डिजीटल युगात फाऊंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाऊंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे पेन पुणेकरांना पाहता आणि खरेदीदेखील करता येणार आहेत. 12 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे पेन फेस्टीवल सुरु असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.

Hindutvadi: राहुल गांधी म्हणाले, हिंदूंना सत्तेत आणायचं आहे, ओवैसी म्हणतात, हीच का तुमची धर्मनिरपेक्षता

Gondia : मृत्यू झालेल्या गाईचे केले विधीवत अंत्यसंस्कार, बळीराजासाठी हळवा क्षण

‘कोरोना काळात शिवसेनेच्या शाखा कुलुपबंद होत्या’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.