pune news | पिंपरी- चिंचवडमध्ये प्रशासक ‘राज’चा फटका, तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

pune pimpri chinchwad water supply | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज सुरु आहे. त्याचा फटका शहरातील नागरिकांना कसा बसत आहे, त्याचे उदाहरण समोर आले आहे. तीन दिवस पाणी नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.

pune news | पिंपरी- चिंचवडमध्ये प्रशासक 'राज'चा फटका, तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
Pimpri ChinchwadImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 1:22 PM

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड | 7 ऑक्टोंबर 2023 : राज्यातील अनेक महानगरपालिका आणि नगरपरिषदेत प्रशासक ‘राज’ सुरु आहे. यामुळे जनतेच्या अनेक प्रश्नांवर सरकारी पद्धतीने काम होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पिंपरी चिंचवडमधील लाखो रहिवाशांना गेल्या तीन दिवसांपासून प्रशासक राजचा फटका बसत आहे. या परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु मनपात जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी कोणीच नाही.

का झाला पाणीपुरवठा विस्कळीत

पिंपरी- चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे या भागातील रहिवाशी हैराण झाले आहे. 5 ऑक्टोबर रोजी महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कामासाठी बंद ठेवला होता. त्याचा परिणाम सहा रोजी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर झाला. दोन दिवस पाणी नसताना तिसऱ्या दिवशी जास्त वेळ पाणीपुरवठा होईल, असे अपेक्षा नागरिकांना होती. परंतु सात ऑक्टोबरला पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिक हैराण झाले.

आधीच दिवसाआड पाणीपुरवठा आता त्यात भर

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आधीच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत प्रशासक राज असल्यामुळे नियोजनाचे तीन-तेरा वाजले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीक पाण्याविना असताना दखल घेणारे कोणी नाही. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासक राज असल्याने मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. अधिकाऱ्यांना जाब विचारायचा कुणी नाही किंवा उत्तरदायित्व घेण्यास कोणी नाही.

हे सुद्धा वाचा

धरण ओव्हर फ्लो पण घरात पाणी नाही

पिंपरी- चिंचवड शहरला पवना धरणातून पाणी पुरवठा होता. यंदा कमी पाऊस झाला असला तरी पवना धरण भरले आहे. धरण ओव्हरफ्लो झाले असताना नागरिकांच्या घरात पाणी नाही. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मनपात प्रशासक राज नसते तर महापौर किंवा नगरसेवकांना जाब जनतेने विचारला असता. परंतु आता जनतेचे ऐकणारे कोणीच नसल्याने तोंडं दाबून बुक्यांचा मार नागरिकांना सहन करावा लागत असल्यासारखा प्रकार झाला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.