पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी मोठी बातमी, येत्या गुरुवार-शुक्रवार पाणी पुरवठ्यावर परिणाम

गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पिंपरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी मोठी बातमी, येत्या गुरुवार-शुक्रवार पाणी पुरवठ्यावर परिणाम
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:36 AM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा (Water Supply) येत्या आठवड्यात विस्कळीत राहणार आहे. येत्या गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठा बंद राहील. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरवासियांना आवश्यक तितके पाणी भरुन ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणी पुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचेही पिंपरी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळवले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणी पुरवठ्यावर कधी परिणाम?

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र.23 निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.10) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

पाणी काटकसरीने वापरा

महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.11) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरीत वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजारहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

पिंपरी महापालिकेत ओबीसी आरक्षण गेल्याचा कुणबी, माळी समाजाला फटका; ‘या’ जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक

पिंपरीतील लॉजवर वेश्या व्यवसाय, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची देह व्यापाराच्या दलदलीतून सुटका

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....