पीएमपीएमएल मालमत्तेचा लिलाव होणार?; कशामुळे ओढवली परिस्थिती?

पुणे महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर लिलावाची वेळ आली आहे. परिवहन सेवा पुरवणारी उपकंपनी पीएमपीएमएलवर ही वेळ आली आहे. पीएमपीएमएलला न्यायालयाच्या आदेशानुसार काही मालमत्तेचा लिलाव करावा लागणार आहे.

पीएमपीएमएल मालमत्तेचा लिलाव होणार?; कशामुळे ओढवली परिस्थिती?
pimpri chinchwad municipal corporationImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 9:45 AM

पुणे : श्रीमंत नगरपालिका असा लौकीक असणाऱ्या पुणे महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर चक्क लिलावाची वेळ आली आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त भागीदारीत असेलेली परिवहन सेवा पुरवणारी उपकंपनी पीएमपीएमएलवर ही वेळ आली आहे. या आधी ठेकेदारांचे पैसे न दिल्याने अडचणीत आलेल्या पीएमपीएमएलला न्यायालयाच्या आदेशानुसार काही मालमत्तेचा लिलाव करावा लागण्याची शक्यता आहे.

2017 मध्ये पीएमपीएमएल आणि काही ठेकेदारांमध्ये दंडाविरुध्द वाद झाला. निविदा अटींची भंग झाल्याचा ठपका ठेवत ऑपरेटर्सना दंड ठोठावण्यात आला होता. हा वाद नंतर लवादाकडे सोपवण्यात आला. लवादाने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर PMPMLने चुकीच्या पद्धतीने दंड लावला असल्याने तो व्याजासह ऑपरेटरला परत करावा असे निर्देश दिले. यानंतर PMPMLने वाटाघाटी करत अँटोनी ट्रॅव्हल्स आणि बीव्हीजी या कंत्राटदारांच्या दंडाची परतफेड केली.

हे सुद्धा वाचा

तर नामुष्की ठरेल

ट्रॅव्हल टाईम या कंत्राटदाराशी 38 कोटीच्या परतफेडी ऐवजी 25 कोटी 37 लाख रुपयांची तडजोडही PMPMLने केली. पण रक्कमेची परतफेड न झाल्याने ट्रॅव्हल टाईम हा कंत्राटदार वरिष्ठ न्यायालयात गेला. मार्च 2023 मध्ये वरिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयानूसार 38 कोटीची परफेड PMPML करायची होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, ती परतफेड न झाल्याने न्यायालयाने जप्ती आणि लिलावाची नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लिलावाची वेळ जर प्रत्यक्षात आली तर मात्र PMPMLबरोबरच PMC आणि PCMC यांच्याकरता सुध्दा ती नामुष्की असणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, यावर पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच पीएमपीएमएलनेही त्यावर भाष्य केलेलं नाही.

असा आहे घटनाक्रम

ऑपरेटर्स ट्रॅव्हल टाइम्स, बीव्हीजी आणि अँटोनी ट्रॅव्हल्स यांची लवादाकडे धाव

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश निरगुडे यांची लवादात नियुक्ती

लवादाकडून या प्रकरणाची संपूर्ण तपशील आणि कागदपत्रांची पडताळणी

लवादाचा निर्णय – PMPML ने चुकीच्या पद्धतीने दंड लावला आहे

लवादाचा निर्णय – व्याजासह ऑपरेटरला दंड परत करावा

ट्रॅव्हल टाइमच्या दंडाची परतफेड न झाल्याने कंत्राटदार कोर्टात

कंत्राटदाराच्या बाजूने कोर्टाचा निर्णय

आदेश न पाळल्याने PMPML च्या मालमत्तेच्या लिलावाद्वारे कंत्राटदाराला दंड परतफेड करण्याचे निर्देश

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.