पुणे मेट्रो, ई-बसनंतर पुणेकरांना आणखी एक पर्याय, लंडनच्या धर्तीवर मिळणार सुविधा, प्रवास होणार गारेगार

लंडनमध्ये धावणाऱ्या बसेससारखा तिचा लूक असणार आहे. या बसची प्रवाशी क्षमता ७० पर्यंत असणार आहे. उभे राहून ४० जण प्रवास करु शकणार आहे. एका बसची किंमत दोन कोटी असणार आहे. १४ फूट ४ इंच असणाऱ्या या बसला मेट्रो स्थानकाचा अडसर येणार नाही.

पुणे मेट्रो, ई-बसनंतर पुणेकरांना आणखी एक पर्याय, लंडनच्या धर्तीवर मिळणार सुविधा, प्रवास होणार गारेगार
pune metro and pmpml
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 7:11 AM

पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. ई-बसेस आल्या आहेत. पुणेकरांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. आता पुणे शहरवासींसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. पुणेकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. त्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) मोठा निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलने वातानुकूलित डबल डेकर बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयास मंजुरी देण्यात आली. एकूण २० डबलडेकर बसेस आता पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार आहेत.

आठवड्याभरात होणार प्रक्रिया

पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी डिसेंबर २०२२ मध्ये डबलडेकर बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला संचालक मंडळाची मंजुरी देखील मिळाली होती. आता त्यासाठी पुढील आठवड्यापासून प्रक्रिया सुरु करणार आहे. यामुळे येत्या सहा महिन्यांत पुणेकरांचा प्रवास एसी डबलडेकर बसूमधून सुरु होणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली.

कशी असणार ई-डबलडेकर बस

पीएमपीएमएलच्या ताफ्यात ई-बसेस आहेत. परंतु डबलडेकर ई-बसेस नाही. पहिली ई-बस २०१८ मध्ये धावली होती. आता त्यानंतर डबलडेकर ई बस येणार आहे. जुन्या डबलडेकर बसला एकच जिना होता. आता नव्या बसला दोन जिने असणार आहे. ही बस वातानुकूलित असणार आहे. या बसमधील सस्पेन्शन अधिक चांगले असणार आहे. त्यात डिजिटल तिकीट काढता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

लंडनमध्ये धावणाऱ्या बसेससारखा लूक

लंडनमध्ये धावणाऱ्या बसेससारखा तिचा लूक असणार आहे. या बसची प्रवाशी क्षमता ७० पर्यंत असणार आहे. उभे राहून ४० जण प्रवास करु शकणार आहे. एका बसची किंमत दोन कोटी असणार आहे. १४ फूट ४ इंच असणाऱ्या या बसला मेट्रो स्थानकाचा अडसर येणार नाही. यामुळे पुणेकरांना प्रवाशाची आणखी एक चांगली सुविधा मिळणार आहे. या बसेस कोणत्या मार्गावर चालवण्यात येणार त्याचा निर्णय अजून झाला नाही.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.