पुणे पोलिसांनी रॉबिनहुडला पकडल्यानंतर हे गाव आले चर्चेत
पोलिसांच्या दृष्टीने तो चोर आहे, पण गावकऱ्यांच्या नजरेत त्याची प्रतिमा वेगळी आहे. कारण त्याने अनेक सामजिक कामे केली आहे. त्यामुळेच त्याची पत्नी जिल्हा परिषदेवर निवडून आलीय.
पुणे : रॉबिनहुड इंग्रजी कथेतील पात्र. श्रीमंताची संपत्ती लुटून ती गरिबांमध्ये वाटायचा. परंतु त्या कथेतील पात्राप्रमाणे असणारा रॉबीनहूड म्हणजेच मोहम्मद इरफान याला पुणे पोलिसांनी अटक केली. इरफान उजाला नावानेही ओळखला जातो. त्याचा अटकेनंतर बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील जोगिया गाव पुन्हा चर्चेत आले आहे. कारण या गावातील उजाला आहे. उजाला यास अजित पवार यांच्या नातेवाईकांकडे चोरी केल्याचा आरोपाखाली अटक झाली होती. उजाला याच्यावर याआधीही दिल्ली एनसीआर, आग्रा, लखनौ, पंजाब, गोवायासह अन्य राज्यांमध्ये २६ गुन्हे दाखल आहेत.
ऑक्टोबर 2021 मध्ये गाझियाबादमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चोरी केल्याप्रकरणी इमरानला अटक झाली होती. त्याच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. आता त्याला पुन्हा अटक झाली आहे. परंतु त्याच्या अटकेबाबत त्याच्या नातेवाईकांकडे कोणतीही माहिती नाही. गावातील त्याच्या घरात त्याची वृद्ध आई राहते. तसेच त्याच्या अटकेबाबत परिसरातील लोकांनाही माहिती नाही. जवळपास वर्षभरापासून तो घरी येत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
रॉबिनहुड नाव कसे
दिसायला साधा असलेला इरफान परिसरात उजाला नावाने ओळखला जातो. 2017 मध्ये दिल्लीत कोट्यवधींचे दागिने आणि आलिशान वाहनांच्या चोरीप्रकरणी त्याला अटक झाली होती. तेव्हा तो आणि त्याचे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले. दिल्ली, कानपूर, आग्रा, जालंधर आदी शहरांतील चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. परंतु चोरी करुन तो पैसा गरिबांसाठी वापर होता. यामुळे त्याला रॉबिनहुड म्हटले जात होते. यामुळे त्या रॉबिनहुड म्हटले जाऊ लागले.
पत्नी जिल्हा परिषदेत
पोलिसांच्या दृष्टीने तो चोर आहे, पण गावकऱ्यांच्या नजरेत त्याची प्रतिमा वेगळी आहे. गावातील व परिसरातील लोकांना मदत करणे, गावातील सार्वजनिक हिताचे प्रश्न स्वतःहून सोडवणे, कोणाच्या मुलीच्या लग्नात, आजारी व्यक्तीच्या उपचारात मदत करणे अशी कामे तो करत असतो. यामुळे ऑक्टोबर 2021 मध्ये पंचायत निवडणुकीच्या वेळी गाझियाबादमधील कोट्यवधींच्या चोरीप्रकरणी त्याला अटक झाली होती.मात्र त्यानंतरही जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची पत्नी विजयी झाली.
चोरीतून सामाजिक काम
रॉबिनहुड हा मूळ बिहारमधील जोगिया गावातील रहिवासी आहे. चोरीच्या पैशातून त्याने त्याच्या मूळ गावात अनेक सामाजिक कामे केली आहेत. रस्ता, रस्त्यावर लाईटींग आणि नागरिकांच्या मदतीला धावून जात असल्याने स्थानिक नागरिकांनीच त्याला रॉबीनहूड नाव दिले. त्याची पत्नी ही संबधीत भागातील जिल्हा परिषद सदस्य असल्याचेही सांगण्यात आले. रॉबिनहुडमुळे त्याचे गाव मात्र चर्चेत आले आहे.