पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोघे ताब्यात; दोघे कोण? गूढ वाढलं!
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं आहे. (pune police arrested two person in Pooja Chavan Suicide Case)
पुणे: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची कसून चौकशी करण्यात येणार असून यांची पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात काय भूमिका आहे? याचा तपास पोलीस करणार आहेत. (pune police arrested two person in Pooja Chavan Suicide Case)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर 11 दिवसानंतर पोलिसांनी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का? हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांचा आम्ही तपास करू शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले नेमके कोण आहेत? याचं कुतुहूल वाढलं आहे. तसेच ऑडिओ क्लिपमधील हे दोघे नसतील तर अरुण राठोड आणि विलास कुठे आहेत? असा सवालही केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री दीड वाजता तिनं सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पूजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.
कोण आहे अरुण राठोड?
पूजा आत्महत्या प्रकरणात नाव आलेला अरुण राठोड हा वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता आहे. तो संजय राठोड यांच्या अत्यंत जवळचा असून राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. संजय राठोड यांच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयातही अरुणचा मुक्त संचार असल्याने तो मंत्र्याचा किती जवळचा आहे
परळीचा रहिवासी
अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या दारावती तांडा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात पूजा सोबत राहत होता. पूजाला काय हवं नको ते देण्याचं काम त्याच्याकडे होतं असं सूत्रांनी सांगितलं. पूजाच्या राहण्याची व्यवस्था मंत्रिमहोदयांनी अरुण राठोड याच्याकडे सोपवली होती. अरुण राठोड आणि पूजा चव्हाण याचे कोणतेही रिलेशन नाही. ते नातेवाईक नसल्याचे बोलले जात आहे.
म्हणून पूजा अरुणच्या संपर्कात
परळीत राहून भाजपमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर पूजा चव्हाण ही संजय राठोड यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. संजय राठोड हे शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. राठोड यांच्या संपर्कात आल्यानंतर पूजा चव्हाण हिचे कर्तृत्त्व आणखी उजळले. याच काळात ती यशाच्या अनेक पायऱ्या चढत वर गेली. राठोड यांनी पूजाची सर्व जबाबदारी अरुणकडे सोपवली होती. पूजाला मॉडेलिंग करायची होती. त्यात अरुण तिला मदत करत होता. त्यामुळे हे दोघेही पुण्यात एकत्र राहू लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पूजाच्या स्वभावाची खडा न् खडा माहिती
अरुण आणि मंत्र्याच्या संभाषणातून अरुणला पूजाच्या स्वभावाची खडा न् खडा माहिती असल्याचं दिसून येतं. पूजा थोडी सर्किट आहे म्हणजे हट्टी आहे. ती ऐकणार नाही, असं अरुण मंत्र्याला सांगतो. यावरून पूजाने एकदा निर्णय घेतला तर ती मागे हटत नाही, हे त्याला माहीत असल्याचं स्पष्ट होतं. तसेच पूजासोबत त्याची पूर्वीपासूनच ओळख असावी असाही अंदाज या क्लिपमधील संभाषण ऐकल्यावर येतो.
मोठी बातमी: संजय राठोडांचा पोहरादेवी दौरा लांबणवीर? प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याच्या आशा धुसर https://t.co/zaqVOpTsBs #sanjayrathod #Pohradevi #Banjara #PoojaChavanSuicide
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2021
संबंधित बातम्या:
संजय राठोडांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच उभी, मीडियाशी बोलू नका; शिवसेना नेत्यांना तंबी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊत बोलले, पण…
पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशाने झाला? वाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट