पुण्यात संगीतकार ए. आर. रहमान यांच्या कार्यक्रमापूर्वी ड्रग्सचा साठा जप्त, काय होता माफियांचा प्लॅन?
Pune city MD drugs : पुणे शहरात संगीतकार ए.आर.रहमान यांचा कार्यक्रम असताना सर्वात महाग असलेले एमएम ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
अभिजित पोते, पुणे : पुण्यात ड्रग्स माफिया (Md Drug) सक्रीय झाले आहेत. पुणे पोलिसांनी कोट्यवधीचे ड्रग्स जप्त केले आहे. विशेष म्हणजे हे ड्रग्स आंतरराज्यीय ड्रग्स तस्करांकडून आले आहे. पुणे पोलिसांनी या ड्रग्स माफियांच्या मुसक्या आवळल्या आहे. पुणे शहरात संगीतकार ए.आर.रहमान यांचा कार्यक्रम होणार होता. त्यापूर्वी हे ड्रग्स आले होते. या कार्यक्रमानिमित्त माफियांनी मोठा प्लॅन केल्याचा संशय आहे. पोलीस अटक केलेल्या दोन्ही माफियांची कसून चौकशी करत आहेत.
काय होता माफियांचा प्लॅन
पुणे शहरात २ कोटी २१ लाख रूपयांचे मॅफे ड्रोन म्हणजे एमएम ड्रग्स जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केलीय. पुण्यातून १ किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थ आले होते. यासंदर्भात माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेस मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली आहे.
माफिया शोधत होते शिकार?
संगीतकार ए. आर. रहमान यांच्या शो मध्ये ड्रग्स घेऊन जाण्याचा प्लॅन माफियांनी तयार केला होता. पुणे शहरात आज संगीतकार ए. आर. रहमान यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होत आहे. त्या ठिकाणी युवकांची मोठी गर्दी होणार आहे. या ठिकाणी युवकांना हेरण्यासाठी ड्रग्स माफिया कार्यरत होते. या युवकांना ड्रग्सच्या जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन होता का? याचा तपास पोलीस करत आहे. आंतरराज्यीय ड्रग्स तस्करांच्या या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
मध्य प्रदेशातून आले होते आरोपी
मध्य प्रदेशातील रतलाम येथून दोन जण पुण्यात आले होते. त्यांच्याकडून २ कोटी २१ रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. तसेच एक आरोपी गेल्या एक महिन्यापासून पुण्यात वास्तव्यास होता. या प्रकरणी पुणे पोलीस सगळ्या बाजूने तपास करणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले. याआधी देखील मोठया कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांना ड्रग्स सापडले होते. पुणे पोलीस या अनुषंगाने तपास करणार आहे.
काय असते मेफेड्रोन पार्टीतील ड्रग्ज
हे ड्रग्ज मिथाइलीनन डायऑक्सी, मथैमफेटामाईन आणि मेफेड्रोन अशा वेगवेगळ्य नावांनी ओळखले जाते. प्रत्येक देशात याची वेगवेगळी कोड नावे आहेत. हे ड्रग्ज श्वासातून किंवा पाण्यातून घेतले जाते. नशेच्या बाजारात याच्या एक ग्रॅमची किंमत 25 हजार रुपये इतकी आहे. नशा करणाऱ्यांत या ड्रग्जची वेगवेगळी नावेही आहेत. हे ड्रग्ज घेतल्यानंतर मेंदूत नशा चढते, धुंदी येते. मोठ्या प्रमाणात आणि स्तात्याने हे घेतल्याने जीवाला धोका होण्याचीही शक्यता असते.
म्याऊ म्याऊ ड्रग्ज म्हणूनही परिचित
मेफेड्रोनला साधारणपणे म्याऊ म्याऊ ड्रग्ज नावाने ओळखले जाते. रेव्ह पार्ट्यांत या ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हे ड्रग्ज अफगाणिस्थान आमि नायजेरियात जास्त प्रमाणात तयार करण्यात येते. पार्टी ड्रग्ज म्हणून याचा वापर देशातही करण्यात येतो. रेव्ह पार्टीत यापूर्वी एलएसडी, लिसर्जिक एसिड डायइथाइम अमाइडचा वार करण्यात येत होता. मात्र त्यानंतर याबाबत कठोर कायदे आल्यानंतर मेफेड्रोनचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला आहे.