कोयता गँगमधील अल्पवयीन मास्टरमाइंडच्या शोधासाठी पोलिसांचा मोठा प्लॅन

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त राकेश कुमार यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. अल्पवयीनमधील मास्टरमाइंडचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

कोयता गँगमधील अल्पवयीन मास्टरमाइंडच्या शोधासाठी पोलिसांचा मोठा प्लॅन
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 8:52 AM

पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत (Terror) कमी होत नाहीय. यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याने ही खरी चिंतेची बाब आहे. या गँगचा प्रसार आता थेट शाळांपर्यंत येऊन पोहोचला आहे. दोन दिवसांपुर्वी प्रेम प्रकरणावरून दोन अल्पवयीन मुलांमध्ये भांडण झाले. त्यात एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला (Attack on Student) करण्यात आला आहे. आता पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी मोठा प्लॅन तयार केला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

पुणे येथील नूतन मराठी विद्यालय (नुमवी) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर भर दिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. विद्यार्थ्याच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला आहे.अल्पवयीन तरुणाने या शाळकरी मुलावर हल्ला केला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे पोलिसांची चिंता वाढलीय.

काय आहे पोलिसांचा प्लॅन

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त राकेश कुमार यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. अल्पवयीनमधील मास्टरमाइंडचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड तयार करण्याचे कामही सुरु केले आहे. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांच्या मागे कोणते गुन्हेगार काम करत आहे, त्यांना रसद पुरवली जात आहे का? याचा तपास केला जात आहे.

शाळांमध्ये समुपदेशन

भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2022 मध्ये 303 गुन्ह्यांत 476 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापैकी 42 मुलांचा मागे कोणत्या अन् कोणत्या गुन्हेगारांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे या मुलांवर दाखल होते.

कोयता गँग पकडून देणाऱ्याला बक्षिस

कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास 3 हजारांचं बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पकडल्यास 10 हजार बक्षीस मिळणार आहे. मकोका किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर देण्यात येणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.