MPSC उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणात ‘हा’ पुरावा ठरणार महत्वाचा, पोलिसांना मिळाले आरोपीचे अपडेट

Pune Darshana Pawar : पुणे येथील MPSC परीक्षा पास उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आलेल्या माहितीनंतर तिच्या मित्राचे लोकेशनही मिळाले आहे.

MPSC उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणात 'हा' पुरावा ठरणार महत्वाचा, पोलिसांना मिळाले आरोपीचे अपडेट
Dharshana Pawar
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 4:55 PM

पुणे : पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी सकाळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. या प्रकरणात पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. पोलिसांची ही शक्यता खरी असल्याचे पोस्टमॉर्टम अहवालातून बाहेर आले आहे. आता या प्रकरणात संशयाची सर्व सुई तिचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे यांच्याकडे जात आहे. त्याच्यासंदर्भात बरीच माहिती पोलिसांनी जमा केली आहे.

आहेत कुठे राहुल हांडोरे

दर्शना पवार हिचा मित्र राहुल हांडोरे याचा शोध पुणे पोलीस घेत आहे. घटनेनंतर त्याचे शेवटचं लोकेशन पुण्यातील कात्रज होते. त्यानंतर दोन दिवसांनी तो बेपत्ता झाला. पुणे शहरातून तो सरळ नवी दिल्लीला गेल्याचे स्पष्ट होत आहे. कारण त्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याने पैसे काढले. तसेच त्याच्या मोबाईलवरुन रविवारी रात्री त्याने नातेवाईकाशी संवाद साधला होता. यावेळी त्याने सांगितले की, एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडले आहे. इतके बोलून त्याने फोन कट केला होता. आता त्याचा फोनचे लोकेशन कोलकाता दिसत आहे.

हा पुरावा सर्वात महत्वाचा

दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला साधारण 8 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यानंतर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. हे सर्व CCTV फुटेजमध्ये दिसले. फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत आला. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहेत. यामुळे तिचा खून झाला असल्याचा संशय आहे. या खून प्रकरणात दर्शनाच्या मित्रावर संशयाची सूई जात आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी १८ जून रोजी सकाळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. या प्रकरणात पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. दर्शना पवार अन् राहुल दोघे किल्लावर गेले होते. परंतु परत एकटा राहुल आला.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.