सिंहगडावर गर्दी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांचा इंगा; दोन दिवसांत 88500 रुपयांची दंडवसुली

Tourist places in Pune | पर्यटकांची गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सिंहगडावर गर्दी करणाऱ्या पर्यटकांना पोलिसांचा इंगा; दोन दिवसांत 88500 रुपयांची दंडवसुली
सिंहगड
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 7:57 AM

पुणे: कोरोनाकाळात सार्वजनिक ठिकाणी आणि पर्यटनस्थळी गर्दी करु नका, असे वारंवार सांगूनही अनेकजण सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशाच काही अतिउत्साही पर्यटकांना पुणे पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे अनेकजण सहली काढत आहेत. सिंहगड हा अशा लोकांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगडावर गर्दी करु नये, अशा सूचना पोलिसांकडून वारंवार करण्यात आल्या होत्या. त्यानंतही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे.

पुणे पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर आलेल्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी 88500 रुपयांचा दंड वसूल केला. एकूण 177 जणांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पर्यटकांची गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मावळच्या पवना धरणात तरुणाचा बुडून मृत्यू

मावळमध्ये वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकाचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शुभम दुधाळ असं या बुडालेल्या तरुण पर्यटकाचं नाव आहे. तो पवना धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तब्ब्ल 2 तासांनी बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश आलं

शुभम आणि त्याचे 6 मित्र मावळ परिसरात वर्षाविहारासाठी आले होते. दुपारच्या सुमारास ते पवना धरण परिसरातील वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन झाल्यानंतर ते पवना धरणातील बॅकवॉटरमध्ये पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी शुभम दुधाळ याला पाण्याचा अंदाज न आल्याने दम लागून तो पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला.

बंदी असतानाही नियमांची पायमल्ली करत मोठ्या प्रमाणात पर्यटन

जिल्ह्यात पर्यटन बंदी असताना सुद्धा पर्यटक मावळ तालुक्यात येत आहेत. लोणावळा, खंडाळा या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक बंदी असतानाही नियमांची पायमल्ली करत पर्यटनस्थळावर दाखल होत आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाला पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत. तसेच नियम मोडणाऱ्या पर्टयकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

संबंधित बातम्या:

बायकोच्या पायगुणाने मंत्रिपद यायचं नाही, सोडचिठ्ठी दे, पुण्यात बड्या राजकीय गुरुला अटक

राजकारणी जाणीवपूर्वक अंधश्रद्धांचा प्रसार करतात, ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांचं वक्तव्य

मुलगी तयार, तिच्या घरचे तयार, बाहेरचे म्हणतायत ‘लव्ह जिहाद’, पुण्यात जोडप्याला लग्नाआधीच धमक्या!

(Pune Police take action against tourist at Sinhgad)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.