पुणे महाविद्यालयात कोयता काढून केली दहशत निर्माण, मग पोलिसांनी काय केले पाहाच
Pune Crime News : पुणे पोलिसांनी कोयता गँगविरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. त्यानंतरही कोयता गँगचा उपद्रव महाविद्यालयात सुरु झाला आहे. मग पुणे पोलिसांनी जालीम उपाय केला. यापुढे असा प्रकार करण्यापूर्वी दहा वेळा गुन्हेगार विचार करतील.
योगेश बोरसे, पुणे : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांच्या (Crime News) धडक कारवाया सुरु आहेत. त्यानंतर कोयता गँगची दहशत पुणे शहरात कमी झालेली नाही. पुणे पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना अटक केली. काही जणांवर मकोका लावला आहे. त्यानंतर काही जणांना हद्दपारसुद्धा केले आहे. पोलिसांच्या या सर्व उपायनंतरही कोयता गँगचा धुमाकूळ शाळा, महाविद्यालयांपर्यंत पोहचला आहे. महाविद्यालयात कोयता काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मग पोलीस आक्रमक झाले. त्यांना कारवाई केली.
काय केले पोलिसांनी
पुण्यातील एका नामांकीत महाविद्यालयात दहशत माजवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या आवारात कोयता अन् सुरा घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील धमकवले जात होते. हा प्रकार पोलिसांपर्यंत गेला. मग या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अद्दल घडवली. त्या आरोपीची महाविद्यालयातूनच धिंड काढली. पोलिसांनी केलेल्या या प्रकारामुळे दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना अनेक वेळा विचार करावा लागणार आहे.
कुठे झाला प्रकार
पुणे शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये हा प्रकार झाला. कोयता घेऊन दहशत माजवणार्या या टोळक्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका युवतीने शांतनु जाधव याच्याशी ब्रेकअप घेतले होते. त्यानंतर त्याने भररस्त्यात तिच्यावर हल्ला केला होता. यावेळी लेशपाल जवळगेसह काही युवकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्यथा गंभीर प्रकार झाला असता.
पुणे शहरातील सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळच हा प्रकार घडला होता. जाधव यांना युवकांनी पकडून पोलीस चौकीत नेले, तेव्हा एकही पोलीस चौकीत नव्हता. यामुळे समाजातून पोलिसांवर टीका होऊ लागली. या प्रकारानंतर पोलीस आयुक्तांनी काही जणांवर निलंबनाची कारवाई केली.