Pune Rain: लोणावळ्याचा पाऊस, खडकवासल्याचं नयनरम्य दृश्य आणि पुण्याचे हाल!

Pune Rain: दरम्यान पावसाळ्यात पर्यटक खडकवासला बघायला, तिथे जायला सुद्धा उत्सुक असतात. यंदा खडकवासला धरण तुडुंब भरलंय आणि खूप सुंदर दिसतंय, निर्बंधांमुळे याठिकाणी जाणं तर अवघड आहे पण तुम्ही खडकवासल्याचा हा व्हिडीओ बघू शकता. ही ड्रोनची दृश्य बघा…

Pune Rain: लोणावळ्याचा पाऊस, खडकवासल्याचं नयनरम्य दृश्य आणि पुण्याचे हाल!
Pune Rain Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 11:12 AM

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. इतका पाऊस (Rain) की खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटनस्थळांवर देखील बंदी घालण्यात आलीये. हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. दरम्यान लोणावळ्यात पाऊस (Lonavla Rain) सुरूच आहे. सलग चौथ्या दिवशी लोणावळ्यात दोनशे मिलिमीटरहून अधिकचा पाऊस बरसलाय. गेल्या चोवीस तासांत लोणावळ्यात 227 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. तर चार दिवसांत 890 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. आत्तापर्यंत लोणावळ्यात 2196 मिलिमीटर इतका पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत लोणावळ्यात अवघा 1374 मिलिमीटर इतकाच पाऊस झाला होता. दोन वर्ष कोरोनामुळे कुठेही जाता आलेलं नाही त्यामुळे आता सगळी गर्दी लोणावळ्याकडे वळताना दिसते. सध्या लोणावळ्यात चांगला पाऊस सुरु आहे. पर्यटक लोणावळा, सिंहगड, खडकवासला (Khadkwasla), माथेरान अशा अनेक ठिकाणी जाताना दिसतायत.

खडकवासला धरण तुडुंब भरलं

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर तरुणाई आणि नागरिक मोठी गर्दी करत आहेत. हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर प्रशासनाकडून कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलीय. 14 ते 17 जुलै दरम्यान पर्यटन स्थळाच्या 1 किलोमीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल,असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलाय. दरम्यान पावसाळ्यात पर्यटक खडकवासला बघायला, तिथे जायला सुद्धा उत्सुक असतात. यंदा खडकवासला धरण तुडुंब भरलंय आणि खूप सुंदर दिसतंय, निर्बंधांमुळे याठिकाणी जाणं तर अवघड आहे पण तुम्ही खडकवासल्याचा हा व्हिडीओ बघू शकता. ही ड्रोनची दृश्य बघा…

नागरिकांचे हाल

पुणे शहरात गेले काही दिवस बऱ्याच ठिकाणी धोकादायक परिस्थिती होती. सतर्कतेचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टीही देण्यात आली. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचं प्रमाण वाढलं ज्यामुळे वाहतूक कोंडी सारख्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. शहरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराने जुलैची सरासरी सुद्धा पार केलीये. पुणे शहरात जुलै महिन्याच्या सरासरी पेक्षा 78 टक्के अधिक पाऊस झाला, जुलै महिन्यात पुणे शहरात सरासरी 220 मिमी इतका पाऊस झालाय. 14 जुलैपर्यंत शहरात 314 मिमी पाऊस झाला, पावसाची उणे 28 मिमीची तूट भरून काढत तब्बल 78 टक्के अधिक पावसाची नोंद झालीये.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.