Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहराकडे येणाऱ्या विमानात प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका, मग काय केले विमान कंपनीने वाचा

पुणे येथील लोहगाव विमानतळावर राची येथून निघालेले विमान येणार होते. विमानाचे रांची येथून उड्डाण झाले. उड्डाणास काही वेळा झाला असताना उच्च रक्तदाबामुळे विमानात बसलेल्या ७३ वर्षीय प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. ही माहिती प्रवाशांनी क्रू मेंबरला दिली.

पुणे शहराकडे येणाऱ्या विमानात प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका, मग काय केले विमान कंपनीने वाचा
AIR-INDIA-TATAImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 1:26 PM

पुणे : आपण एखादा प्रवास करताना अचानक उद्धभवलेला आजारामुळे अडचणीत सापडतो. परंतु अशा वेळी मदत मिळत राहते. बिहारमधून रांचीहून पुणे शहराकडे येणाऱ्या विमानात एका वृद्ध प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. मग धावपळ सुरु झाली. इंडिगो कंपनीची ही विमान होती. पायलटने अटीतटीची परिस्थिती पाहून त्या प्रवाशाला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याने विमान पुणे ऐवजी जवळच असणाऱ्या नागपूर विमानतळावर उतरवले. त्यासाठी नागपुरातील विमानतळ प्राधिकरणे परवानगी दिली. विमानेचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्या व्यक्तीला रुग्णालयात पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E-672 रांची शहारवरुन निघाली होती. ती पुणे येथील लोहगाव विमानतळावर येणार होती. विमानाचे उड्डाणास काही वेळा झाला होता. परंतु उच्च रक्तदाबामुळे विमानात बसलेल्या ७३ वर्षीय प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. मग प्रवाशाची ही परिस्थिती पाहून क्रू मेंबरला आणि वैमानिकाला याची माहिती दिली.

अटीतटीच्या प्रसंगाची माहिती मिळताच वैमानिकाने नागपूर विमानतळ येथील एटीसीशी संपर्क साधला. पायलटने एटीसीकडून नागपुरात इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. एटीसीने ग्रीन सिग्नल दिला. पुणे येथे लँडींग होणारे विमान रात्री 10.12 वाजता नागपुरात उतरले. विमानतळावर आप्तकालीन व्यवस्था तयार होती. त्या वृद्ध व्यक्तीला त्वरीत किम्स-किंग्सवे रुग्णालयात नेण्यात आले.

हे सुद्धा वाचा

पण प्रयत्न पडले उपुरे

किंग्सवे हॉस्पिटलचे डेप्युटी जनरल (कम्युनिकेशन) एजाज शमी यांनी सांगितले की, वृद्ध प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात येताच त्यांची तपासणी केली. परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मृतदेह इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला होता. या घटनेची माहिती त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना देण्यात आली. वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला नाही, परंतु एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी इंडिगो कंपनीने केलेल्या प्रयत्नांचे कौतूक होत आहे.

अन् दुसरा असा प्रकार

देशातील विमान कंपन्या प्रवाशांना महत्त्वच देत नाहीत याचे उदाहरण राजधानी दिल्लीत पाहायला मिळालं. विमानतळावर प्रवाशाला सोडून विमान पुण्याला निघून गेले. गो फर्स्ट चे हे विमान होते. शुक्रवारी पुणे येथील अंकुश अग्रवाल यांचे दिल्लीतून पुण्यासाठी विमान होते. विमान कंपनीच्या वतीने प्रवाशाला संदेश पाठवून विमानाची वेळ बदल्याचे सांगितले. मात्र जेव्हा अंकुश हे कंपनीने दिलेल्या वेळेनुसार विमानतळावर पोहोचले. पण त्यापूर्वीच हे विमान पुण्याला रवाना झाले होते. दरम्यानअग्रवाल हे ग्राहक न्यायालयात याबाबत दाद मागणार आहेत.

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.