Pune news | पुणे शहरातील हा राजकीय देखावा ठरणार चर्चेत, गणेशोत्सवापूर्वी सुरु झाली चर्चा

Pune ganesh utsav 2023 | पुणे शहरात गणेशोत्सवाच्या आयोजनाची तयारी जोरात सुरु आहे. उद्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेश मंडळांनी आपले देखावे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. त्यात एक देखावा चर्चेत आला आहे.

Pune news | पुणे शहरातील हा राजकीय देखावा ठरणार चर्चेत, गणेशोत्सवापूर्वी सुरु झाली चर्चा
Pune Ganesh utsavImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 10:29 AM

अभिजित पोते, पुणे | 18 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील गणेशोत्सवाचे वेध देशभरातील भाविकांना असते. पुणे, मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातीलच नाही तर विदेशातूनही भाविक येतात. १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. दहा दिवसांच्या या उत्सवासाठी घराघरात तयारी सुरु आहे. त्याचवेळी गणेश मंडळांनी आरास पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. पुणे शहरातील दगडूशेठ गणपती मंडळाकडून अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली जात आहे. त्याचवेळी रविवार पेठेतील गणेश मंडळाने राजकीय देखावा केला आहे.

काय केला आहे देखावा

पुणे शहरातील गणेश मंडळांचा देखावा नेहमीच वेगळा असतो. त्यामुळे पुण्यातील गणपती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची मांदियाळी जमा होते. पुणे येथील गणेश मंडळे समाजात घडत असलेल्या घडामोडींवर देखावे करतात. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न गणेश मंडळांचा असतो. आता पुणे येथील प्रसिद्ध मूर्तिकार सतीश तारू यांनी बनवलेला देखाव्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी बनवलेला राजकीय देखावा सध्याच्या परिस्थितीवर समर्थक ठरत आहे.

काय आहे देखावा

सतीश तारू यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या परिस्थितीवर देखावा तयार केला आहे. राज्यात ज्या पद्धतीने सध्याचे राजकारण सुरु आहे, त्यावर हा देखावा आहे. या राजकारणात कार्यकर्त्यांची अवस्था कशी झाली आहे ते त्यांनी देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. देखाव्यात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळे झेंडे हातात घेतलेले दिसत आहे. ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’, असे साकडे घालत विठ्ठलालाच प्रश्न विचारताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

कोणत्या मंडळाने केला देखावा

रविवार पेठेतील एका गणेश मंडळाने हा राजकीय देखावा सादर केला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून सध्याच्या राजकारणावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे या अनोखा देखाव्याची चर्चा गणेशोत्सवाआधीच सुरु झाली आहे. सतीश तारु यांनी स्त्रीभ्रूण हत्या, गड संवर्धन शैक्षणिक, कौटुंबिक आणि राजकीय असे देखावे आजपर्यंत सादर केले आहे. त्याची चांगली चर्चा झाली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.