कोरोनाकाळातही पुणेकरांनी जमा केला 1 हजार कोटी मिळकत कर, महापालिकेच्या कर वसुली विभागाची विक्रमी कामगिरी

पुणेकरांनी (Pune) गेल्या पाच महिन्यांमध्ये एक हजार कोटींचा मिळकत कर (Property Tax) महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या (Corona) परिस्थितही महापालिकेला मोठं उत्पन्न मिळालं आहे. विशेष म्हणजे कोरोना असतानाही गेल्यावर्षीच्या तुलनेत 211 कोटी 51 लाख रुपये अतिरिक्त मिळकत कराची प्राप्ती झाली आहे.

कोरोनाकाळातही पुणेकरांनी जमा केला 1 हजार कोटी मिळकत कर, महापालिकेच्या कर वसुली विभागाची विक्रमी कामगिरी
पुणे महानगरपालिका
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 1:35 PM

पुणे : पुणेकरांनी (Pune) गेल्या पाच महिन्यांमध्ये एक हजार कोटींचा मिळकत कर (Property Tax) महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या (Corona) परिस्थितही महापालिकेला मोठं उत्पन्न मिळालं आहे. विशेष म्हणजे कोरोना असतानाही गेल्यावर्षीच्या तुलनेत 211 कोटी 51 लाख रुपये अतिरिक्त मिळकत कराची प्राप्ती झाली आहे. महापालिकेत समाविष्ठ करण्यात आलेल्या 11 गावांमधल्या मिळकत कराचाही यामध्ये समावेश आहे. (Pune residents have deposited Rs 1,000 crore Property tax to the Municipal Corporation)

अभय योजनेतून प्रमाणिक करदात्यांना सवलत

मिळकत कर वसुली करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार यांच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातल्या नागरिकांना मिळकत कर भरता यावा यासाठी महापालिकेने गेल्यावर्षी अभय योजना सुरू केली होती. त्यामुळे प्रमाणिक करदात्यांना कर भरण्यासाठी सवलत देण्यासाठी यंदाही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वेळेवर कर भरणाऱ्यांना 15 टक्के सूट

गेल्यावर्षी प्रमाणिकपणे करभरणा केलेल्या आणि यंदा वेळेवर कर भरणाऱ्यांना मिळकत करात 15 टक्के सूट देण्याच निर्णय घेण्यात आला होता. या सवलतीचा 4 लाख 4 हजार 275 मिळकतदारांनी लाभ घेतला आहे. यांच्याकडून 303 कोटी 76 लाख रुपये कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

अनेक मिळकती शोधून कर प्रणालीत आणल्या

शहरातल्या 1 लाख 42 हजार 238 मिळकतदारांनी मिळकत करात पाच आणि दहा टक्के सवलत मिळवली आहे. गेल्या पाच महिन्यांत या मिळकतदारांनी महापालिकेत 497 कोटी 25 लाख रुपये कर भरला आहे. अभय योजनेच्या माध्यमातून सर्व मिळकतदारांना 62 कोटी 29 लाख रुपयांची एकूण सवलत देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने अनेक करप्रणालीत येत नसलेल्या अनेक मिळकती शोधून त्यांना कर प्रणालीत आणलं होतं. त्यामुळे मिळकत करात मोठी वाढ झाली आहे.

यावर्षी 8 हजार 370 कोटी कर संकलनाचे उद्धिष्ठ

महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 8 हजार 370 कोटी रूपयांच्या कर संकलनाचे उद्धिष्ठ ठेवलं आहे. एकीकडे कोरोनामुळे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचं उत्पन्न घटत असताना पुणेकरांनी दाखवलेल्या विश्वासामुळे एक हजार कोटी रूपयांचं कर संकलन शक्य झालं आहे असं स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी म्हटलं आहे. महापालिकेने गेल्या पाच महिन्यांत सुमारे 2 हजार 800 रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळवलं आहे.

इतर बातम्या :

VIDEO : मी न घाबरणारा मराठा आहे, उज्ज्वल निकम यांचं बेधडक भाषण

अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करू; संजय राऊतांचा राणेंना अप्रत्यक्ष इशारा

ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंड वांझोटे; विजय वडेट्टीवार संतापले

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.