पुणे यामध्ये ही अव्वल, शासनाला मिळाले कोट्यवधींचे उत्पन्न
पुणेकरांनी शासनाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. तसेच शासनाच्या उत्पन्नात अजूनही वाढ होणार आहे. एकीकडे शासनाला उत्पन्न मिळाले असताना दुसरीकडे पुणे शहराचे पर्यावरणही यामुळे योजनेमुळे चांगले होणार आहे.
अभिजित पोते, पुणे : पुणे शहराचा सहभाग प्रत्येक क्षेत्रात असतो. उद्योग, व्यापार, शासकीय योजना, शिक्षण क्षेत्रात पुण्याचे वेगळेपण आहे. यामुळे पुणे तेथे काय उणे म्हटले जाते. आता पुणेकरांनी शासनाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून दिले आहे. 7 कोटी 37 लाख रुपयांचा फायदा शासनाला झाला आहे. या उत्पन्नात अजूनही वाढ होणार आहे. यामुळे लवकरच हे उत्पन्न दहा कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. एकीकडे शासनाला उत्पन्न मिळाले असताना दुसरीकडे पुणे शहराचे पर्यावरणही यामुळे चांगले होणार आहे. कारण यामुळे जुन्या वाहनांची कार्यक्षमता सुधारणार आहे. पुणे आरटीओच्या कामगिरीमुळे हे झाले आहे.
असे मिळाले उत्पन्न
पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने ही कामगिरी केली आहे. पुणे आरटीओला वाहन फेरनोंदणीतून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला वाहनांच्या फेर नोंदणीतून सात कोटी रुपयांच्यावर उत्पन्न मिळाले आहे. वाहनांच्या फेरनोंदणीमुळे प्रदूषण कमी होणार आहे. यामुळे पर्यावरणाचा फायदा होतो. तसेच वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारली जाते. केंद्र सरकारच्या स्क्रॅप पोलिसीनुसार पंधरा वर्षांपुढील वाहनांची फेर नोंदणी होत असते.
किती वाहनांची झाली फेरनोंदणी
एका वर्षात तब्बल 22 हजार 436 वाहनांची पुर्ननोंदणी पुणे उपप्रादेशक परिवहन विभागाकडे झाली आहे. या माध्यमातून पुणे आरटीओला 7 कोटी 37 लाख रुपयांचा फायदा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात फेर नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. अजूनही अनेक वाहनांची फेर नोंदणी प्रलंबित आहे. यामुळे उत्पन्न दहा कोटी रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पुणे शहरात हेल्मेट सक्ती
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून हेल्मेट न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. पुणे शहरात तीन पथके तयार केली आहे. ही पथके शहरात हेल्मेट न वापणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार आहे. याआधी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सर्व सरकारी कार्यालयात जात हेल्मेट वापरासाठीचे प्रबोधन करण्यात आले होते.
पुणे शहरात हेल्मेट न घालणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. यापूर्वी हेल्मेट वापराबाबत प्रबोधन केल्यानंतर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला गेला आहे. त्यासाठी विशेष तयारी पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने केली आहे.