Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंड असलेल्या पुणे परिसरात उष्मघाताची प्रकरणे वाढली? दोन महिन्यांत किती जणांना फटका

heatstroke in Pune : पुणेसारख्या कधीकाळी थंड असलेल्या शहरातही लोकांना उष्मघाताचा त्रास होऊ लागला आहे. पुणे, सातारा अन् सोलापूर जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून 200 जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे.

थंड असलेल्या पुणे परिसरात उष्मघाताची प्रकरणे वाढली? दोन महिन्यांत किती जणांना फटका
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 11:32 AM

पुणे : पुणे शहरातील वातावरण थंड आहे. त्यामुळे देशातील सर्वात चांगेल शहर म्हणून पुण्याची ओळख झाली आहे. अनेक जण रोजगारासाठी पुण्याची वाट धरत असताना अनेकांनी निवृत्तीनंतर पुणे शहरात वास्तव करण्यास प्राधान्य दिले आहे. पुणे शहरच नाही पुणे परिसरात चांगले वातावरण आहे. परंतु आता पुणे परिसरातील तापमानात बदल होत आहे का? हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती आहे. कारण गेल्या काही दिवसांत पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात उष्माघाताची प्रकरणे वाढली आहे. या परिसरातून सुमारे 200 जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे.

काय आहे पुणे विभागात परिस्थिती

इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म (IHIP) या संस्थेने पुणे सातारा आणि सोलापूर परिसरातील माहिती जारी केली आहे. त्यानुसार मार्च 2023 पासून आतापर्यंत एकूण 2.31 लाख व्यक्तींची तपासणी झाली आहे. सुदैवाने या तीन जिल्ह्यांमध्ये उष्माघाताने एकाचाही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती पुणे परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालकांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. यासंदर्भातील माहिती सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, शहरातील सरकारी रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालये अशा एकूण 458 आरोग्य युनिटमधून संकलीत केली आहे.

राज्यात 12 जणांचा मृत्यू

उष्मघातामुळे पुणे परिसरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. परंतु महाराष्ट्रात एकूण 12 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. मार्चपासून आतापर्यंत एकूण 2,649 उष्माघाताची प्रकरणे समोर आली आहे. त्यात रायगड जिल्ह्यात 412 प्रकरण आहे. त्यानंतर वर्ध्यात 334 उष्माघाताचे रुग्ण आढळले, त्यानंतर नागपुरात 317 रुग्ण आढळले आहेत.

हे सुद्धा वाचा

कोणत्या जिल्ह्यात आहेत रुग्ण

उष्माघाताच्या रुग्णांची संख्या चंद्रपूर, नंदुरबार, अमरावती, लातूर, मुंबई-उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यात मोठी आहेच. उष्मघात टाळण्यासाठी रोज किमान चार लिटर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. उष्णतेमुळे थकवा हा सौम्य प्रकारातील आजार आहे, परंतु उपचार न केल्यास उष्माघात होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.