Pune Crime News : पीटी शिकवताना या शिक्षकाने हे काय केले, अखेर तक्रार गेली अन्…
Pune Crime News : पुणे शहरातील शाळेत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे शिक्षकांची नियुक्ती करताना शाळा प्रशासनाला अधिकच काळजी घ्यावी लागणार आहे. शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकाने केलेल्या या प्रकारामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय.
पुणे | 1 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील शिक्षकाचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शारीरिक शिक्षण म्हणजे पीटीचे धडे देता, देता या शिक्षकाने नसता उद्योग केला. घडलेला प्रकार अल्पवयीन विद्यार्थींनी घरी आल्यावर सांगितला. त्यानंतर हे प्रकरण सरळ पोलीस ठाण्यात गेले. पुण्यातील लोहगाव भागात घडलेल्या या प्रकारामुळे पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आता शाळेच्या प्रशासनाकडून त्या शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकार
पुणे शहरातील लोहगाव परिसरातील केंद्रीय विद्यालय आहे. या केंद्रीय विद्यालयात संजय देशमुख शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. संजय देशमुख याने शाळेतील दहा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींना पीटी शिकवताना आक्षेपार्ह स्पर्श केला. तसेच अश्लील संभाषण केले. शाळेतील त्या मुलींनी हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने शिक्षकाविरोधात तक्रार दिली. त्यानंतर शिक्षकावर विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कधी घडला प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील केंद्रीय विद्यालयात १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या दरम्यान हा प्रकार घडला. शाळेत सुरु असलेल्या क्रीडा तासाच्यावेळी मैदानावर हा प्रकार घडला. क्रीडा शिक्षक संजय देशमुख याने मुलींचा विनयभंग केला. त्याने या मुलीना वाईट हेतून स्पर्श करत अश्लील संभाषण केले. नको त्या ठिकाणी स्पर्श करत ‘तुला पीटी क्लास कसा वाटतो’ असे विचारले. मुलींनी हा प्रकार घरी सांगितल्यावर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला.
शाळा प्रशासनावर मोठी जबाबदारी
ज्या शाळेत मुली आहेत, त्या शाळा प्रशासनाने शिक्षकांची निवड करताना खूपच खबरदारी घेणे गरजेचे आहे. नियुक्तीपूर्वी शिक्षकाचे चरित्र तपासले जाणे गरजेचे आहे. संजय देशमुख यांच्यासारख्या शिक्षकांमुळे शाळेची प्रतिमा खराब होत असते. यामुळे शाळा प्रशासनावर ही मोठी जबाबदारी आहे. शाळांनी ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यास पालकांनी आपल्या मुला, मुलींची चिंता राहणार नाही.