ईडीची मोठी कारवाई, पुणे येथील 429 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मोठ्या व्यक्तीस अटक

Pune News : पुणे शहरातील बहुचर्चित ४२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणात एका बड्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास ७ जुलैपर्यंत कोठडी दिली आहे. यापूर्वी या प्रकरणात त्या व्यक्तीला अटक झाली होती.

ईडीची मोठी कारवाई, पुणे येथील 429 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मोठ्या व्यक्तीस अटक
ed
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 4:45 PM

पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यास अटक केली आहे. 429 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात ही अटक झाली आहे. सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष असलेल्या अमर मूलचंदानी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. ईडीने न्यायालयात त्यांना हजर केले. न्यायालयाने ७ जुलैपर्यंत त्यांना कोठडी दिली आहे. सेवा विकास बँकेच्या घोटाळ्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालयाकडे गेली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला.

काय आहे प्रकरण

सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी २०१६ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. मूलचंदानी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण सुमारे ४२९ कोटी रुपयांचे आहे. मूलचंदानी यांनी जवळच्या व्यक्तींना बँकेकडून कर्ज वाटप करुन आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणात ईडीने त्यांच्याकडे २७ जानेवारी २०२३ रोजी ईडीने छापेमारी केली होती. या प्रकरणात यापूर्वी त्यांना अटक झाली. परंतु जामिनावर ते बाहेर आले.

ऑगस्ट २०२१ मध्ये तक्रार

मूलचंदानी यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात ऑगस्ट २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यांवर सेवा विकास सहकारी बँकेत कर्जासाठी १२४ बनावट प्रस्ताव तयार केले. त्यामाध्यमातून ४२९ कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना वितरित केले. कोणतीही कागदपत्रे न तपासता त्यांनी कर्जाचे वाटप केले. त्या व्यक्तींची परतफेडीची क्षमता नसतानाही कर्ज दिले गेले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाचा तपास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

कोणी केली होती तक्रार

सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या बँकेचे ऑडिट केले होते. त्या लेखा परिश्रणातून हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अमर मलचंदानी, अशोक मुलचंदानी, मनोहर मूलचंदानी, दया मूलचंदानी, साधना मूलचंदानी व सागर मूलचंदानी अशा सहा जणांना अटक करण्यात आली होती. ईडी मूलचंदानी, रोजरी एजुकेशन ग्रुपचे निर्देशक विनय आरहाना, सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी आणि त्यांच्या परिवाराची 121 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.