तापमान वाढले, पुणे पोलिसांसाठी घेतला महत्वाचा निर्णय

Heat Wave : उन्हाचे चटके जाणवू लागल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील वाहतूक पोलिसांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी असणार आहे.

तापमान वाढले, पुणे पोलिसांसाठी घेतला महत्वाचा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 2:42 PM

पुणे : उन्हाळा सुरु झाला आहे. मार्च महिन्यानंतर एप्रिलमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच बसत आहे. हळूहळू दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहे. वाढत्या उन्हामुळे शाळांच्या वेळाही बदल्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी सुट्या जाहीर केल्या आहे. या बदलत्या ऋतूमध्ये कडक उष्णतेपासून बचाव करणे महत्वाचे आहे. याद्दष्टिने पुणे पोलिसांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मे महिन्यात वाढणाऱ्या तापमानासोबतच उष्णतेच्या लाटेपासून बचाव करणे शक्य होणार आहे.

काय आहे निर्णय

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांसाठी महत्वाचा निर्णय झाला आहे. 50 पेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या अखेरीपर्यंत दुपारी 12 ते सायंकाळी 5 दरम्यानच्या फील्ड ड्युटी देण्यात येणार नाही. पुणे शहरातील सुमारे 15% कर्मचारी 50 पेक्षा जास्त वयाचे आहेत. पुणे शहर वाहतूक शाखेत एकूण 8,628 कर्मचारी आहे. 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या कर्मचाऱ्या या पाच तासांच्या कालावधीत कार्यालयीन काम सोपवले जाईल.

हे सुद्धा वाचा

पर्यायी काम देणार

पुण्याचे पोलिस आयुक्त रतेश कुमार यांनी सांगितले की, गेल्या पाच-सहा दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. यामुळे आमचे जे कर्मचारी ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांनी फील्ड ड्युटीऐवजी कार्यालयीन कामकाज द्यावे, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. यामुळे या १५ टक्के कर्मचाऱ्यांना वाहतूक व्यवस्था, गस्त अशी कामे मे अखेरपर्यंत देण्यात येणार नाही.

दोन गटात विभागणी

१५ टक्के कर्मचारी वगळल्यानंतर ८५ टक्के पोलिसांची दोन गटांमध्ये विभागणी केली आहे. यापैकी प्रत्येक गट फील्ड ड्युटी आणि ऑफिस ड्युटी करणार आहे.

या केल्या सूचना

  • शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी थंड पेये घ्या
  • बर्फ टाकलेले फ्रूट ज्यूसपेक्षा कैरी पाणीसारखे पेय घ्या
  • निंबू पाणीसारखे पेय सेवन करा
  • कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी घ्या
  • अंगवार कॉटनचे कपडे परिधान करा
  • घरगुती आहराचे सेवन करा

काळजी घेणे गरजेचे

पोलीस कर्मचारी आणि सर्व सामान्य लोक उन्हात राहिल्यास हायपरथर्मिया, सन स्ट्रोक आणि उष्णतेच्या लाटेचा त्रास होऊ शकतो. तसेच एखाद्याला डिहायड्रेशन, किडनी स्टोन, मलमधून रक्तस्त्राव, आणि मूळव्याध यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.