पुण्यात वेताळ टेकडीवरुन नवा वाद, भाजपमधील दोन नेत्यांची एकमेकांच्या विरोधात भूमिका
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोथरुड - पाषाण आणि सेनापती बापट रस्ता अशा तीन परिसरांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मंजूर केला आहे. याला विरोध होत आहे. हा विरोध राजकीय पक्षांकडून होत आहे.
अभिजित पोते, पुणे : पुणे महानगरपालिकेच्या एका विकास प्रकल्पावरुन वाद सुरु झाला आहे. हा वाद केवळ रहिवाशांपुरता मर्यादीत नाही. एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्येही आहे. भाजपमध्ये यासंदर्भात परस्परविरोधी भूमिका घेतली गेली आहे. या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता अशा तीन परिसरांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मंजूर केला आहे. हे बोगदे झाल्यास पुण्याचा दक्षिण भाग आणि पुण्याचा उत्तर भाग यादरम्यान प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु या प्रकल्पाला विरोध होत आहे.
का होत आहे विरोध
कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता अशा तीन परिसरांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्यासाठी वेताळ टेकडी फोडून बोगदे तयार करावे लागणार आहे. वेताळ टेकडी फोडण्याचा या निर्णयास विरोध होत आहे.पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाला पर्यावरण प्रेमी आणि टेकडीप्रेमींनी विरोध दर्शवला आहे. पुण्यातील वेताळ टेकडी फोडून कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय घेतला आहे.
तीन हजार झाडे तोडणार
बोगदे झाल्यास वेताळ टेकडीवरील तीन हजार झाडे तोडावी लागणार आहे. वृक्ष तोडीचा परिणाम या टेकडीच्या भोवताली असलेल्या जैववैविध्य्यावर होणार आहे, असा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे.प्रकल्पासाठी येणार एकूण साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
भाजपमध्ये दोन भूमिका
वेताळ टेकडी फोडून कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा निर्णयास भारतीय जनता पक्षातही परस्पर भूमिका घेतली जात आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. मात्र पुणे शहरातील रहिवाशी आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.
दक्षिण अन् उत्तर भाग जोडला जाणार
पुण्यातील कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता अशा तीन परिसरांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर करण्यात आला आहे. हे बोगदे झाल्यास पुण्याचा दक्षिण भाग आणि पुण्याचा उत्तर भाग यादरम्यान प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
हे ही वाचा
संगणक अभियंत्यांचा ग्रुप पानशेत धरणावर फिरायला गेला, पाण्यात उतरला, मग घडली दुर्देवी घटना
वीज बिल वाचवण्यासाठी पुणे मेट्रोचा अनोखा प्रयोग, यामुळे होणार बचतच बचत