Pune News | नोकरीचे आमिष दाखवून तीन महिलांना सौदी अरेबियात नेले, पुढे असे काही घडले की…

Pune News | नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे अनेक प्रकार घडत असतात. राज्यातील तीन महिलांना दलालाने नोकरी देण्याच्या बाहण्याने सौदी अरेबियात नेले. परंतु त्यांना नोकरी दिली नाही. त्यांच्यासंदर्भात असे काही घडले की...

Pune News | नोकरीचे आमिष दाखवून तीन महिलांना सौदी अरेबियात नेले, पुढे असे काही घडले की...
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 2:51 PM

पुणे | 19 सप्टेंबर 2023 : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार अनेकवेळा उघड होतात. विदेशात नोकरी लावून देण्यासाठी आर्थिक फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुणे शहरातील तीन महिलांची अशीच फसवणूक झाली. या महिला पुणे शहरातील मार्कट यार्डमधील आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या आहेत. या महिलांना सौदी अरेबियात नोकरीची ऑफर दिली गेली होती. दर महिन्याला 35,000 पगार देण्याचे निश्चित झाले होते. मुंबईतील एका एजंटमार्फत या महिला सौदी अरेबियात पोहचल्या. परंतु त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना धक्काच बसला. असे काही होईल, याची कल्पना त्या महिलांना नव्हती.

नेमके काय घडले

पुण्यातील या महिलांना ओळखीतील मुंबईतील महिलेमार्फत एका एजंट महिलेला संपर्क केला. या महिलांना सौदी अरेबियात काम देण्याचे आश्वासन दिले. सर्व कागदपत्रांची जमवाजमव करत या महिला सौदी अरेबियात पोहचल्या. त्यानंतर सौदी अरेबियात असलेल्या त्या मध्यस्थ व्यक्तीने त्यांनी विविध ठिकाणी घरकामासाठी पाठवले. परंतु त्या ठिकाणी त्यांना काम देण्याऐवजी घरमालकांनी मारहाण केली. त्यांना उपाशी ठेवले. त्यांना पगारही दिला नाही. यामुळे या महिलांवर मोठे संकट आले.

महिलांनी पुढे असे केले की

उपासमार आणि मारहाणीमुळे महिला त्रस्त झाल्या होत्या. त्यांनी सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. राज्य महिला आयोगाचा ईमेल आयडी त्यांनी मिळाला. तिघांपैकी एका महिलेने ईमेल करत राज्य महिला आयोगाला सुटका करण्याची विनंती केली. त्यानंतर राज्य महिला आयोगाने त्या मेलची दाखल घेत प्रयत्न सुरु केले. केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबियातील परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला. तीन महिने प्रयत्न केल्यानंतर त्या महिलांना मायदेशी आणण्यात आले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणतात महिला आयोगाच्या अध्यक्षा

तीन महिला सौदी अरेबियातून सुटल्यानंतर पुणे शहरात आठ दिवसांपूर्वी आल्या. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. महिला आयोगाने वीस महिलांची परदेशातून सुटका केली आहे. त्यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्यास महिलांनी आयोगाशी संपर्क साधावा, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.