Pune News : पिस्तूल घेतले बेकायदेशीररित्या, हाताळताना चाप ओढला, अन् नको ते झाले…

Pune Crime News : पुणे शहरात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु होता. कोयता गँग सक्रीय होती. त्यावेळी कोयता मिळतात कुठे? हा प्रश्न होता. परंतु आता बेकायदेशीर पिस्तूल मिळत आहे. या पिस्तूल प्रकरणातून एक जण गंभीर जखमी झालाय.

Pune News : पिस्तूल घेतले बेकायदेशीररित्या, हाताळताना चाप ओढला, अन् नको ते झाले...
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 2:01 PM

पुणे | 10 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील एका युवकाला बेकायदेशीरित्या खरेदी केलेले पिस्तूल चांगलेच महागात पडले. परंतु या प्रकाराची दुसरी बाजूही समोर आली आहे. पुणे शहरात बेकायदेशीर पिस्तूल मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोयता गँगमुळे चर्चेत आलेली पुण्यातील गुन्हेगारी पुन्हा बेकायदेशीर पिस्तूल प्रकरणामुळे उघड झाली आहे. पुणे पोलीस या गुन्हेगारांच्या अजूनही मुसक्या बांधू शकले नाही. आता बेकायदेशीर पिस्तूल घेणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले

पुणे येथील खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये संगरुण हे गाव आहे. या गावातील अविष्कार तुकाराम धनवडे (वय १९, रा. सांगरूण, ता. हवेली) याने एक पिस्तूल बेकायदेशीररित्या मिळवले. हे पिस्तूल अभय छगन वाईकर (वय २२) याला तो दाखवत होता. यावेळी पिस्तूलचा चाप ओढला गेला आणि गोळी अभय वाईकर याला लागली. या घटनेत अभय गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोघे होते मित्र

अभय वाईकर आणि अविष्कार धनवडे हे दोन्ही मित्र आहेत. वाईकरने बेकायदेशीररित्या पिस्तूल मिळवले, ते पाहण्यासाठी मित्राला बोलवले. अन् चाप ओढूनही दाखवत असताना गोळी सुटली. त्यानंतर ती गोळी सरळ अभय याला लागल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले. याप्रकरणी अविष्कारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभय याच्यावर रुग्णायलयात उपचार सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

बेकायदेशीर पिस्तूल मिळतात तरी कुठे

गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या १९ वर्षीय युवक बेकायदेशीर पिस्तूल विकत घेऊ शकतो. त्याला हे मिळतात कुठे? हे माहीत आहे. परंतु पोलिसांना यासंदर्भात माहिती नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता अविष्कार यांच्या चौकशीतून काही माहिती मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.