Rain : राज्यात पाऊस सक्रीय, पुढील १२ दिवस मुसळधार, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

weather update and rain : राज्यात मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरु आहे. पुढील १२ दिवस राज्यात पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Rain : राज्यात पाऊस सक्रीय, पुढील १२ दिवस मुसळधार, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 8:43 AM

पुणे | 18 जुलै 2023 : जुलै महिना पावसाचा असणार आहे. राज्यात आता पुढील १२ दिवस पाऊस कायम असणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट दिले आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात चांगली वाढ होणार आहे. कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

कुठे कोणता अलर्ट

कोकणातील अन् विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच खान्देश, मध्य महाराष्ट्रासह १० जिल्ह्यांत आणि मराठवाड्यामधील ८ जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. राज्यात आता २७ जुलैपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांना ?

  • १८ जुलै : रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली
  • १९ आणि २० जुलै : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा
  • २१ जुलै : रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली

रत्नागिरी जिल्ह्यांत अतिवृष्टी

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भागात पुढील पाच दिवस वाऱ्यांचा वेग जास्त राहणार आहे. आषाढातील अमवास्येचे दुसऱ्या दिवशी समुद्राला उधाण आले होते.

हे सुद्धा वाचा

विदर्भात पाऊस

विदर्भात पाऊस सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यातील दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्री पुन्हा जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग झाली. मंगळवार सकाळपासूनच गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील कामांना वेग आलाय. गोसेखुर्द धरण अन् चिंचडोह बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील वैनगंगा तसेच प्राणहिता नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे शहरात यलो अलर्ट

पुणे शहरासाठी पावसाची प्रतिक्षा संपणार आहे. पुणे शहराला यलो अलर्ट दिला आहे. यामुळे पुणे शहरांमधील धरणांमध्ये जलसाठ्यात वाढ होणार आहे. यंदा पुणे शहरातील पावसाने अजून सरासरी गाठली नाही.

मुंबई जोरदार पाऊस

मुंबई पूर्व उपनगरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर या परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.